सध्या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांना प्रेक्षकांची खूप पंसती मिळत आहे. अशा चित्रपटांना सिनेमागृहात जाऊन बघण्याला प्रेक्षक प्राधान्य देतात. आता असाच एक नवा कोरा टकर्तम भुगतम’ (Kartam Bhugtam ) हा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. श्रेयस तळपदे ( Shreyas Talpade) आणि विजय राज ( Vijay Raaz ) यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट तुम्हाला कर्म आणि नियतीच्या एका रोमांचक प्रवासात घेऊन जाईल. मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अनेक रहस्याने भरलेल्या जगाची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
[read_also content=”खेळता खेळता कूलरला लागला हात, विजेच्या धक्काने सात वर्षिय चिमूकलीचा जागेवरच मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/a-girl-died-after-she-came-in-contact-with-electric-shock-in-cooler-nrps-530161.html”]
काल आणि लक यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या सोहम पी शाह याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अभिनेता श्रेयसने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाच ट्रेलर रिलीज केलं आहे.