फोटो सौजन्य - Social Media
गेल्या २ महिन्यांपूर्वी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे लग्न अभिनेता जाहीर इकबालसोबत पार पडले होते. जास्त रौनक-शौनकवर लक्ष न देता, अगदी साध्या पद्धतीने दोघांनी लग्न उरकुन घेतले. या लग्नात दोघांचे कुटुंब तसेच काही मित्रपरिवार उपस्थित होते. दोघे नव्या जोडप्यासाठी सोशल मीडियावर शुभेच्छा तसेच आशीर्वादाचा वर्षाव झाला होता. यादरम्यान लग्नाच्या अगदी २ महिन्यांनंतर सोनाक्षीने घर विकण्यास काढले आहे. विशेष म्हणजे, याच घरामध्ये सोनाक्षीने जाहीरसोबत लग्न हुरकले होते आणि तेच घर विकायला काढल्यामुळे दोघांच्या चाहत्यांनी प्रश्नांचा पाऊस पाडला आहे.
अगदी 1 वर्षांपूर्वीच सोनाक्षी तिच्या या नव्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली होती. 2023 मध्ये खरेदी केलेला अपार्टमेंट फक्त १ वर्षांत विकण्याची वेळ का आली? असा प्रश्न नेटकरी करत आहेत. रिअल इस्टेटच्या एका इंस्टग्राम हॅन्डलवर सोनाक्षीच्या या अपार्टमेंटचे फोटो शेअर झाले आहेत. त्या फोटोंबरोबर एक व्हिडीओदेखील शेअर केला गेला आहे. महत्वाची बाब म्हणजे व्हिडिओमध्ये कुठेही नमूद नाही कि सदर फ्लॅट सोनाक्षी आणि जाहीरचे आहे. परंतु, व्हिडीओ पाहताचक्षणी सोनाक्षीच्या चाहत्यांनी हे सोनाक्षीचे अपार्टमेंट असल्याचे सांगितले. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे कि या घराची झलक त्यांनी सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नघरात दिसली होती. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
The Property Store नावाच्या इंस्टाग्राम हॅण्डलने या घराची व्हिडीओ शेअर केली आहे. या पोस्टखाली पोस्ट कर्त्याने कॅप्शन मधून घरासंबंधित माहिती दिली आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे कि घर विकणे आहे, तसेच घरासंबंधित इतर माहिती देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे व्हिडिओमध्ये वांद्रे पश्चिम भागात 2 BHK, सी व्हिवसह तेही 4200 चौ.फूट कार्पेट एरिया इतका अपार्टमेंट असल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिडीओ संपताच क्षणी अपार्टमेंटची एकूण किंमत लिहून येते. एकंदरीत, या फ्लॅटची एकूण विक्री किंमत २५ कोटी रुपये इतके आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी त्यांचा प्रतिसाद दिला आहे.