• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Follow These 7 Healthy Habits During Navratri

यंदा नवरात्रीमध्ये आत्‍मसात करा ‘या’ ७ आरोग्‍यदायी सवयी, शरीराला होतील फायदे

नवरात्रीच्या दिवसांमध्ये केलेला उपवास आरोग्यसाठी अतिशय प्रभावी आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी तुम्ही आहारात फळे आणि पौष्टिक भाज्यांचे सेवन करू शकता.नवरात्रीच्या उपवासामध्ये उपवासाचे पदार्थ प्रामुख्याने खाल्ले जातात. उच्‍च कॅलरी असलेल्‍या गोड पदार्थ खावेसे वाटू शकते, पण फळे, सफरचंदाची खीर, समक तांदळाची खीर व कोशींबीर यांसारख्‍या आरोग्‍यदायी पर्यायांसह स्‍वादाची पूर्तता करा.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 03, 2024 | 03:38 PM
यंदा नवरात्रीमध्ये आत्‍मसात करा 'या' ७ आरोग्‍यदायी सवयी

यंदा नवरात्रीमध्ये आत्‍मसात करा 'या' ७ आरोग्‍यदायी सवयी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

माहिम येथील फोर्टिस सहयोगी एसएल रहेजा हॉस्पिटलमधील विभागप्रमुख (न्‍यूट्रिशन अँड डायटेटिक्‍स) कुमारी राजेश्‍वरी व्‍ही शेट्टी यांचा लेख

दरवर्षी भक्‍तीभावाने दुर्गामातेचा नवरात्री सण साजरा केला जातो. हा सण नऊ दिवस साजरा केला जातो आणि दस-याच्‍या दिवशी समाप्‍त होतो. या नऊ दिवसादरम्‍यान भक्‍त दुर्गामातेची आराधना करतात आणि दिवसभर उपवास देखील करतात.उपवासाच्‍या कालावधीदरम्‍यान भक्‍त धान्‍य किंवा डाळींपासून बनवलेले खाद्यपदार्थ सेवन करत नाहीत, तसेच मांसाहारी खाद्यपदार्थ देखील सेवन करत नाहीत. परिणामत: शरीरातील व्हिटॅमिन्‍स व मिनरल्‍ससह आवश्‍यक पौष्टिक घटक कमी होण्‍याची शक्‍यता वाढते. चांगली बातमी अशी आहे की, यादरम्‍यान जल्‍लोषात सण साजरा करण्‍यासोबत उपवास करण्‍याचे आणि आरोग्‍यदायी व उत्‍साही राहण्‍याचे अनेक मार्ग आहेत.(फोटो सौजन्य-istock)

आरोग्‍यास अनुकूल पद्धतीने उपवास करण्‍याबाबत जाणून घेण्‍यापूर्वी उपवासाचे काही आरोग्‍यदायी फायदे जाणून घेऊया, जे पुढीलप्रमाणे आहेत:

• चयापचय क्रिया उत्तम होण्‍यास मदत होते: उपवासादरम्‍यान व्‍यक्‍ती सेवन करणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे शरीराची चयापचय क्रिया सुधारण्‍यास मदत होते. परिणामत: रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम होण्‍यास आणि ऊर्जा पातळी वाढण्‍यास मदत होते.
• हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहते: नवरात्रीदरम्‍यान केला जाणाऱ्या उपवासादरम्‍यान वेळेवर उपवासाचे पदार्थ सेवन केले जातात. यामुळे हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहण्‍याची खात्री मिळते आणि उच्‍च कोलेस्‍ट्रॉल पातळ्या देखील कमी होतात.
• डिटॉक्सिफिकेशनमध्‍ये साह्य: नवरात्रीदरम्‍यान सेवन केल्‍या जाणाऱ्या उपवासाच्‍या आहारामध्‍ये ताजी फळे व भाज्‍यांचा समावेश केल्‍यास शरीराचे डिटॉक्सिफाय होण्‍यास आणि एकूण आरोग्‍य उत्तम राहण्‍यास मदत होऊ शकते.उपवास करण्‍याचे विविध मार्ग आहेत, ज्‍यांचे अनेक आरोग्‍यदायी फायदे आहेत, जसे वजनावर नियंत्रण राहते आणि मेंदूचे कार्य उत्तमपणे होते. सात आरोग्‍यदायी सवयींबाबत सांगण्‍यात आले आहे, ज्‍यांचे उपवास करताना पालन केले पाहिजे.

हे देखील वाचा: नवरात्री उत्सवात उपवास करून ‘या’ पद्धतीने करा वाढलेले वजन कमी, शरीर राहील स्लीमट्रीम

दिवसाच्‍या सुरूवातीला हलक्‍या स्‍वरूपाचा व्‍यायाम करा:

शारीरिकदृष्‍ट्या सक्रिय राहिल्‍याने तुम्‍ही आरोग्‍यदायी राहू शकता आणि आयुष्‍य वाढू शकते. जिमला जाण्‍यापूर्वी कॅलरीयुक्‍त पदार्थांचे सेवन करणे आवश्‍यक असले तरी उपवास करणाऱ्या व्‍यक्‍तीला हलक्‍या स्‍वरूपाचा व्‍यायाम करण्‍याची शिफारस केली जाते. हलक्‍या स्‍वरूपाच्‍या व्‍यायामामुळे मानसिक व शारीरिक आरोग्‍य उत्तम राहण्‍यासोबत मूड देखील उत्‍साहित होतो आणि रात्रीच्‍या वेळी पुरेशी झोप मिळते.

वेळेवर औषधे घ्‍या:

मधुमेह, उच्‍च रक्‍तदाब आणि हृदयसंबंधित आजार यांसारख्‍या कोमोर्बिडिटीजने पीडित व्‍यक्‍तींनी उपवास करण्‍यापूर्वी डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍यावा. सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे, त्‍यांनी आहाराचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासोबत वेळेवर औषधे घेतली पाहिजेत. तसेच, टाइप १ मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींनी उपवास करणे टाळावे. याव्‍यतिरिक्‍त, तुम्‍हाला अशक्‍त वाटत असल्‍यास त्‍वरित काहीतरी खावे, ज्‍यामुळे तुमचे आरोग्‍य बिघडणार नाही.

दिवसभर टप्‍प्‍याटप्‍प्‍याने लहान स्‍वरूपात खात राहा:

दिवसाच्‍या शेवटी एकदम आहार सेवन करण्‍याऐवजी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने खात राहा आणि भूक लागत असल्‍यास आरोग्‍यदायी स्‍नॅक्‍स उपयुक्‍त ठरू शकते. असे केल्‍याने रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्‍यास मदत होईल आणि तुम्‍ही त्‍वरित थकणार नाही याची खात्री मिळेल. तसेच, दुपारच्‍या वेळी अधिक प्रमाणात आहार सेवन केला असल्‍यास रात्रीच्‍या वेळी लवकर व हलक्‍या स्‍वरूपात आहार सेवन करा, ज्‍यामुळे संतुलन राहिल.

हायड्रेटेड राहा:

‘निर्जल व्रत’ (पाणी न पिता उपवास) करत नसाल तर दिवसभर पाणी पित हायड्रेटेड राहा. पाणी हे हायड्रेटेड राहण्‍यासाठी सर्वोत्तम असले तरी तुम्‍ही नारळपाणी, ताक, ग्रीन टी आणि लिंबूपाणी यांचे सेवन करू शकता.

आहारामध्‍ये राजगिराचा समावेश करा:

या कालावधीदरम्‍यान शरीराला कमी प्रमाणात प्रोटीन मिळत असल्‍यामुळे आहारामध्‍ये राजगिराचा समावेश करण्‍याची उच्‍च शिफारस केली जाते, जे प्रोटीनचे उत्तम स्रोत आहे. तुम्‍ही दूध किंवा दलियासोबत राजगिरा-आधारित दलियाची निवड करू शकता, सोबत हंगामी भाज्‍यांची निवड करू शकता, ज्‍यामुळे शरीराला दिवसभर आवश्‍यक ऊर्जा मिळेल. याव्‍यतिरिक्‍त, तुम्‍ही बटाटे व साबुदाणा यांसारखे उच्‍च कार्बोहायट्रेड संपन्‍न फूड्स सोबत कोबी, टोमॅटो, शिमला मिरची, दुधी भोपळा यांसारख्‍या फायबरयुक्‍त भाज्‍या एकत्र करू शकता. तसेच भाज्‍यांना तळण्‍याऐवजी भाजण्‍याची, ग्रिल करण्याची किंवा बेक करण्‍याची खात्री घ्‍या.

हे देखील वाचा: डायबिटीस असून सुद्धा Shardiya Navratri 2024 मध्ये उपवास करायचा आहे? तर मग द्या ‘या’ गोष्टींकडे विशेष लक्ष

बकव्‍हीट आहारामध्‍ये उत्तम पर्याय आहे:

कार्बोहायड्रेट्स व प्रोटीनची कमतरता भरून काढण्‍यासाठी तुम्‍ही कुट्टू किंवा बकव्‍हीटच्‍या चपाती किंवा पूरी बनवू शकता. तसेच, समक तांदळाची उच्‍च शिफारस केली जाते, यामुळे पचनशक्‍ती उत्तम होते आणि अनेक हंगामी भाज्‍यांसोबत सेवन केले पाहिजे.

अधिक गोड किंवा अधिक तळलेले पदार्थ सेवन करू नका:

उच्‍च कॅलरी असलेल्‍या गोड पदार्थ खावेसे वाटू शकते, पण फळे, सफरचंदाची खीर, समक तांदळाची खीर व कोशींबीर यांसारख्‍या आरोग्‍यदायी पर्यायांसह स्‍वादाची पूर्तता करा. हे पदार्थ घरी बनवत असाल तर रिफाइन्‍ड साखरेऐवजी गुळ किंवा मधाचा वापर करा.अधिक तळलेल्‍या स्‍नॅक्‍ससह पॅकेटमध्‍ये पॅकेज केलेले सॉल्‍टेड स्‍नॅक्‍सचे सेवन टाळणे सर्वोत्तम आहे, कारण मीठाचे अधिक प्रमाण व घातक फॅट्समुळे ते अनारोग्‍यकारक आहेत. त्‍याऐवजी, बदाम, मनुका व अक्रोड यांसारखे पौष्टिक नट्सचे सेवन करा. अशा सोप्‍या पायऱ्यांचे पालन केल्‍यास दीर्घकाळपर्यंत, विशेषत: सणासुदीच्‍या काळात तुमच्‍या खाण्‍याच्‍या सवयींमध्‍ये सुधारणा होण्‍यास मदत होईल. यासोबत लक्षात ठेवा की आरोग्‍यदायी आहाराचे सेवन करण्‍यासह नियमित व्‍यायाम आणि पुरेशी झोप देखील महत्त्वाची आहे, ज्‍यांचे तुम्‍ही वर्षभर पालन केले पाहिजे.

Web Title: Follow these 7 healthy habits during navratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 03:38 PM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
1

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब
2

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब
3

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर
4

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पंढरपूरमध्ये रेशनचा काळाबाजार, पुरवठा विभागाकडून कारवाईसाठी टाळाटाळ; शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप

पंढरपूरमध्ये रेशनचा काळाबाजार, पुरवठा विभागाकडून कारवाईसाठी टाळाटाळ; शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

‘ही’ कंपनी ठरली E Scooter मार्केटची बादशाह, फक्त एका महिन्यात विकल्या 20 हजाराहून जास्त युनिट्स

‘ही’ कंपनी ठरली E Scooter मार्केटची बादशाह, फक्त एका महिन्यात विकल्या 20 हजाराहून जास्त युनिट्स

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका

Kangana Ranaut on Rahul Gandhi: ‘राहुल गांधी देशासाठी कलंक, ते सर्वत्र देशाची…’, कंगना राणौतची जोरदार टीका

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य

सख्ख्या भावानेच केली बहिणीची फसवणूक; वारसा हक्कातील मालमत्ता बेकायदेशीररित्या केली हस्तगत

सख्ख्या भावानेच केली बहिणीची फसवणूक; वारसा हक्कातील मालमत्ता बेकायदेशीररित्या केली हस्तगत

कोर्टाबाहेरच ग्राफिक डिझायनरवर जीवघेणा हल्ला; दीड लाख रुपयांसह कागदपत्रे पळवली

कोर्टाबाहेरच ग्राफिक डिझायनरवर जीवघेणा हल्ला; दीड लाख रुपयांसह कागदपत्रे पळवली

व्हिडिओ

पुढे बघा
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.