जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त स्टार प्लस आपल्या प्रेक्षकांसाठी एक अनोखा सोहळा घेऊन येत आहे. ‘हाथी घोडा पालकी, बर्थडे कन्हैया लाल की’. या कार्यक्रमात भक्ती, नृत्य, खेळ, पारंपरिक विधी आणि मनोरंजनाचा संगम पाहायला मिळणार आहे. वाहिनीवरील नामांकित कलाकार एकत्र येऊन श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा आनंद साजरा करतील.
या खास सोहळ्यात ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील अभिराची भूमिका साकारणारी समृद्धी शुक्लाही सहभागी झाली आहे. अनुभव शेअर करताना ती म्हणाली “हा खरोखर अविस्मरणीय अनुभव होता. स्टार प्लसकडून आम्हाला नेहमीप्रमाणे भरभरून प्रेम मिळाले. या कार्यक्रमात परफॉर्म करण्याबरोबरच सहकलाकारांसोबत धमाल करण्याची, गप्पा मारण्याची संधी मिळाली. खरं तर, असे इव्हेंट आम्हाला कामासारखे वाटत नाहीत, उलट जणू मित्रमैत्रिणींसोबत प्ले डेटवर गेलो आहोत, अशीच मजा येते.”
जन्माष्टमीच्या आपल्या गोड आठवणी सांगताना समृद्धी म्हणाली “लहानपणी आमच्या कॉलनीत दही-हंडीच्या मोठ्या स्पर्धा होत असत. आम्ही मित्रमैत्रिणींसोबत गल्लीगल्ली फिरून हंडीफोड बघायचो, गप्पा मारायचो आणि धमाल करायचो. रात्री १२ वाजता आई-बाबा मला मंदिरात घेऊन जात असत, जिथे भजनांचा आनंद लुटता यायचा. हीच माझी सर्वात आवडती आणि हृदयात कोरलेली जन्माष्टमीची आठवण आहे.” या कार्यक्रमात प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे मुले विरुद्ध मुली अशी मजेदार स्पर्धा. दोन्ही संघ जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत, आणि प्रेक्षकांना मिळणार आहे दुहेरी मजा मनोरंजनाची आणि उत्सवाची!
यंदा कोण होणार खिताबाचा मानकरी? स्टार प्लसचा विशेष सोहळा ‘हाथी घोडा पालकी, बर्थडे कन्हैया लाल की’ या प्रश्नाचे उत्तर घेऊन येतोय. पारंपरिक रंगत, नृत्य, खेळ आणि कलाकारांची उत्साही स्पर्धा यामुळे हा जन्माष्टमी विशेष कार्यक्रम प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. मनोरंजन आणि अध्यात्माचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी हा सोहळा नक्की पाहा. शनिवार, १६ ऑगस्ट रोजी रात्री ७ वाजता, फक्त स्टार प्लसवर.