फोटो सौजन्य - युट्युब
स्त्री २ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन : बॉलीवूडचा स्त्री २ या चित्रपटावर एका आठवड्यामध्ये प्रेक्षकांनी पैशांचा पाऊस केला आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असलेले श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांना सिनेमा गृहांमध्ये भरभरून प्रेम दिले जात आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे परंतु अजूनही सिनेमा सिनेमा गृहांमध्ये दमदार कामगिरी करत आहे. अमर कौशिक दिग्दर्शित, अलौकिक हॉरर-कॉमेडी त्याच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘स्त्री 2’ सह जवळपास ६ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतला आहे आणि त्याने अपेक्षेपेक्षा जास्त कामगिरी केली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच जबरदस्त कलेक्शन केले नाही तर दुसऱ्या वीकेंडमध्येही या चित्रपटाने धमाल केली.
चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरामध्ये ७६.५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या सिनेमाने ११८ कोटींची कमाई करून विक्रम केला होता. या हॉरर कॉमेडी सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. जगभरामध्ये या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी १७२ कोटींची कमाई केली. चार दिवसांमध्ये या चित्रपटाने एकाच दिवशी जगभरामध्ये १७२ कोटींवरून २८३ कोटींवर उडी मारली. या सिनेमावर अजुनपर्यत मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. कामाच्या दिवशी या सिनेमाची कमाई घसरली होती. परंतु सातव्या दिवशी या सिनेमाने ४०१ कोटींची कमाई केली आहे. फक्त भारतामध्ये या सिनेमाने सातव्या दिवशी २८९.६ कोटींची कमाई केली.
आठव्या दिवशी या सिनेमाने भारतामध्ये फक्त १८.२ कोटींची कमाई केली होती. आठ दिवसांमध्ये हा चित्रपटाने जगामध्ये ४२८ कोटींची कमाई केली आहे. शनिवारी म्हणजेच चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दहाव्या दिवशी सिनेमाने ५०५ कोटींची कमाई केली आहे. तर भारतामध्ये या सिनेमाने ३६१ कोटींची कमाई केली आहे.
या चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा ५० ते १२० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या सिनेमाने त्याच्या बजेटच्या ४-५ पटीने जास्त कमाई केली आहे.