फोटो सौजन्य - स्त्री २ युट्युब
स्त्री २ चित्रपटाचे कलेक्शन : स्त्री २ या चित्रपटाने सिनेमा गृहांमध्ये कहर केला आहे. या चित्रपटाने फक्त २ दिवसांमध्ये १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या अभिनयाचे कौतुक देशामध्ये केले जात आहे. त्याचबरोबर पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या विनोदांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच हॉरर-कॉमेडी चित्रपट रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहेत. ‘स्त्री 2’ रिलीज होऊन ४ दिवस झाले असून या चित्रपटाने रविवारी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत नवा विक्रम केला आहे.
स्त्री २ च्या चित्रपटाच्या तिकिटांची ॲडव्हान्स बुकिंग दीड लाखाहून अधिक तिकिटांची करण्यात आली होती. स्त्री २ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी आप्रदर्शित झाला होता. चित्रपटाने पूर्वावलोकन आणि रिलीजच्या दिवशी ७६.५ कोटींची दमदार ओपनिंग केली. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ४१.५ कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी ५४ कोटी रुपयांची कमाई केली. आता चौथ्या दिवसाची आकडेवारीही समोर आली आहे. सकनील्कच्या मते, ‘स्त्री २’ ने चौथ्या दिवशी एकूण ५८.२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
हेदेखील वाचा – Road To UFC सेमीफायनलमध्ये भारताचा अंगद बिष्ट! पाहा कधी आणि कुठे पाहता येणार सामना?
‘स्त्री २’ तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शनसह वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता चौथ्या दिवसाच्या कमाईने या चित्रपटाने अजय देवगणच्या ‘शैतान’ चित्रपटाला मागे टाकले आहे. ‘शैतान’ने भारतात १७६.०५ कोटी रुपयांची कमाई केली होती आणि वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम त्याच्या नावावर होता.