मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायर बातमी समोर येत आहे. वर्षानुवर्ष प्रेक्षकांच मनोरंजन करणाऱ्या तारक मेहता का उल्टा चष्मा (taarak mehta ka ooltah chashmah) मालिकेत रोशन सिंग सोधी ची भूमिका करणारे अभिनेते गुरुचरण सिगं बेपत्ता (Gurucharan Singh Missing ) झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी 4 दिवसापुर्वी त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिल्ली पोलिसात केली. या तक्रारीवरुन आता पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस त्यांच्याशी संबधित लोकांना या विचारत असून ते बेपत्ता होण्यापूर्वी त्यांचा शेवटचं संभाषण कुणासोबत झालं हे शोधण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. या प्रकरणी अधिकृतपणे एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.
[read_also content=”तैवानमध्ये पुन्हा भूकंप, रिश्टर स्केलवर 6.1 तीव्रतेची नोंद, महिन्यात तिसऱ्यांदा बसलाय भूकंपाचा धक्का! https://www.navarashtra.com/world/earthquake-in-taiwan-of-6-1-richter-scale-nrps-527619.html”]
रिपोर्ट नुसार, 22 एप्रिल 2024 पासून गुरुचरण सिंग बेपत्ता झाले आहेत. “जवळपास 4 दिवसांपूर्वी दक्षिण दिल्लीतील पालममध्ये गुरुचरण सिंग यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याआधारे आता पोलीस तपास करत आहेत. मात्र, एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. अद्याप त्याची नोंद करण्यात आलेली नाही. गुरुचरण यांना दिल्ली विमानतळाच्या आत नव्हे, तर आसपास पाहण्यात आल्याचंही समोर आलं आहे. ते शेवटचा कोणाशी बोलले किंवा मेसेज केला हे शोधण्यासाठी पोलिस आता कॉल रेकॉर्ड तपासत आहेत.”
शुक्रवारी गुरुचरण सिंग यांच्या वडिलांनी दिल्लीत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, “50 वर्षीय गुरुचरण 22 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजता मुंबईला रवाना झाले. ते विमान पकडण्यासाठी विमानतळावर पोहोचले. पण ते ना मुंबईला पोहोचले आणि ना घरी परतले. त्यांचा फोनही नॅाट रिचेबल आहे.
गुरुचरण सिंह ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका 2008 पासून केली. काही कारणास्तव त्यांनी 2013 मध्ये हा कार्यक्रम सोडला आणि लाड सिंह मानने त्यांची जागा घेतली. पण लोकांच्या मागणीनुसार गुरुचरण 2014 मध्ये शोमध्ये परतले. 6 वर्ष काम केल्यानंतर पुन्हा 2020 मध्ये त्याने पुन्हा हा शो सोडला आणि बलविंदर सिंग सूरीने त्याची जागा घेतली.