फोटो सौजन्य - Social Media
सोनी सबवरील तारक मेहता का उलटा चष्मा हे कॉमेडी कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून भारतीयांचे मनोरंजन करत आहे. तारक मेहता का उलटा चष्मा या कार्यक्रमास भारतीयांचे आवडते कार्यक्रम म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. या कार्यक्रमाने स्वतःची एक वेगळीच ओळख तयार केली आहे. या कार्यक्रमाचे काही प्रेक्षक तर असे आहेत, ज्यांना तारक मेहता का उलटा चष्मा पाहिल्याशिवाय जेवणही जात नाही. जेवणताना टीव्हीवर तारक मेहता का उलटा चष्मा पाहिजेच. हे कार्यक्रम गेल्या १६ वर्षांपासून भारतीयांचे मनोरंजन करत आहे. भारतातील विविध परंपरा आणि संस्कृतीचे जगभर प्रसार करण्यात कार्यक्रम नेहमी अव्वल राहिले आहे. तारक मेहता का उलटा चष्मा या कार्यक्रमात भारतातील विविध भाषिक कसे एकत्र आणि गुण्यागोविंदाने राहतात, याचे उत्तम उदाहरण दाखवते. तसेच देशवासियांना एकतेचे संदेश देते.
तारक मेहता का उलटा चष्मा या कार्यक्रमातील कलाकारांना कार्यक्रमाने इतके प्रेम दिले आहे कि त्यांना इतर कामांची गरज मुळीच भासत नसेल असे चित्र नेहमीच दिसून येते. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार भारतातील घराघरात तसेच प्रत्येक भारतीयांच्या मनात स्थान निर्माण करून बसला आहे. परंतु काही दिवसांपूर्वी, तारक मेहता का उलटा चष्मा कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी कार्यक्रमासंबंधित न्यायालयाकडे आरोप केला होता. त्यांचा आरोप होता कि तारक मेहता का उलटा चष्मा या कार्यक्रमातील पात्र तसेच त्यांच्या नावाचा उपयोग चुकीच्या कामांसाठी केला जात आहे. काही वेबसाईट जाणून बुजून या गोष्टी करत आहेत. दरम्यान, न्यायालयाला काही सोशल मीडिया हॅन्डल्स, वेबसाइट्स तसेच यूट्यूब्स चॅनेल्स सापडले आहेत जेथे कार्यक्रमातील पात्रांचा उपयोग डीपफेक, एनिमेशन तसेच AI जनरेटेड फोटोस तयार करण्यासाठी केला जात आहे.
हे सुद्धा वाचा : पडद्यामागे मैत्री, दिखाव्यासाठी राजकीय नेत्यांचे शत्रुत्व! कंगना रनौतने केला खुलासा
न्यायालयाने या गोष्टीवर निर्णय जाहीर करत त्या सोशल साईट्स यांना सामग्री नष्ट करण्यासाठी ४८ तासांची अवधी दिली आहे, अन्यथा तातडीने कडक कारवाई करण्यात येण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर संबंधित सोशल प्लॅटफॉर्मच्या लिंकला ब्लॉक केले जाईल. न्यायालयाच्या निर्णयावरून तारक मेहता का उलटा चष्मा कार्यक्रमाचे निर्माते असित मोदी यांनी न्यायालयाचे आभार मानले आहे.