मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला, एक-दोन नव्हे तर तब्बल...; (Photo Credit- X)
२६ जानेवारी रोजी सकाळी ६:५४ च्या सुमारास टीचर्स कॉलनीमध्ये सत्यप्रकाश दुबे यांच्या पत्नी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. याच वेळी शेजारी राहणाऱ्या अमरेश रेड्डी यांचा पाळीव कुत्रा घरासमोर मोकळा होता. काही समजण्यापूर्वीच या कुत्र्याने महिलेच्या मानेवर झडप घातली. कुत्र्याने त्यांच्या चेहऱ्याला आणि हाता-पायांना गंभीर दुखापत केली. मालकाने कुत्र्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला.
Pet #DogAttacks Woman During Morning Walk in #Bengaluru A woman was seriously injured after being attacked by a pet dog while she was on a morning walk in the #TeachersColony of #HSRLayout in Bengaluru. The incident occurred when the dog, reportedly from a nearby house in the… pic.twitter.com/XpSRIajUC4 — BNN Channel (@Bavazir_network) January 30, 2026
पीडित महिलेला तातडीने सेंट जॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुत्र्याचा हल्ला इतका भयानक होता की, डॉक्टरांना त्यांच्या जखमा शिवण्यासाठी ५० पेक्षा जास्त टाके घालावे लागले. सध्या त्या गंभीर मानसिक धक्क्याखाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महिलेचे पती सत्यप्रकाश दुबे यांनी एचएसआर लेआउट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. “कुत्रा इतका धोकादायक होता की मालकालाही त्याला आवरता आले नाही. कुत्र्याला ना साखळदंडाने बांधले होते, ना त्याच्या तोंडावर मास्क होता. अशा निष्काळजी मालकाला कठोर शिक्षा व्हायला हवी,” अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी मालकाविरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
‘केन कार्सो’ ही मूळची इटलीची प्रजाती असून तिला ‘इटालियन मस्टिफ’ म्हणूनही ओळखले जाते. रोमन काळात या कुत्र्यांचा वापर युद्धात, शिकार करण्यासाठी आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी केला जात असे. यांचे वजन ४५ ते ५० किलोपेक्षा जास्त असू शकते आणि उंची ७० सेंटीमीटरपर्यंत असते. हे अत्यंत मस्कुलर आणि ताकदवान असतात. हे कुत्रे अत्यंत जिद्दी आणि आक्रमक असू शकतात. या कुत्र्यांना योग्य सामाजिकीकरण आणि कठोर प्रशिक्षणाची गरज असते, अन्यथा ते मानवी वस्तीसाठी धोकादायक ठरू शकतात.






