मुंबई : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा द काश्मीर फाईल्स(The Kashmir Files) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड करणार आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत २३१ कोटींची कमी केली आहे. आता विवेक अग्निहोत्रींना ब्रिटीश संसदेतूनही (The British Parliament Invites Vivek Agnihotri) बोलावणे आले आहे. विवेक तिथे जाऊन काश्मीर पंडितांच्या व्यथा मांडणार आहेत. तर या चित्रपटाचे यश पाहता, या चित्रपटाला इतर भाषांतूनही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
[read_also content=”किरीट सोमय्यांचे पुढचे टार्गेट हसन मुश्रीफ; पुणे दौऱ्यात खळबळजनक पुरावे देणार https://www.navarashtra.com/maharashtra/hasan-mushrif-kirit-somaiyas-next-target-will-give-sensational-evidence-in-pune-tour-261364.html”]
आमचा हेतू साध्य झाला-विवेक
एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्रींनी सांगितले की, हो, मला आणि माझ्या पत्नीला ब्रिटीश संसदेतून बोलावणे आहे. पुढच्या महिन्यात आम्ही तिथे जाणार आहोत. आमच्या चित्रपटातून काश्मीर पंडितांवर झालेल्या अत्याचार आणि नरसंहाराचा मुद्दा जगाच्या कानोकोपऱ्यांत पोहचवण्याचे आमचे लक्ष्य होते. आम्ही आमचे लक्ष्य पूर्ण करतोय, याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. हा चित्रपट जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहचत आहे, असे विवेक यांनी सांगितले आहे. यासाठी कुठलेही प्रमोशनल फंडे केले नसल्याचेही विवेक यांनी सांगितले आहे. आम्ही केवळ माध्यम आहोत, असेही ते म्हणाले.
या चित्रपटात अनुपम खेर व्यतिरिक्त, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्ल्वी जोशी, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णीसह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटातून १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांवर काश्मिरात झालेल्या अत्याचाराची कथा मांडण्यात आली आहे.