'द साबरमती रिपोर्ट'ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई, पहिल्या विकेंडला कसा मिळाला प्रतिसाद ?
बॉलिवूडची सुप्रसिद्ध निर्माती एकता कपूरचा ‘द साबरमती रिपोर्ट’ (The Sabarmati Report) नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनेक दिवसांपासून रिलीज डेट कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ढकलत असल्यामुळे चित्रपट रिलीज होत नव्हता. गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या समोर चित्रपटाची नवी रिलीज डेट आली आहे. आता अशातच चित्रपटाचा आणखी एक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा सुरू असून येत्या १५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आहे. निवणडणूकींच्या रणधुमाळीत महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात ‘द साबरमती रिपोर्ट’ (The Sabarmati Report) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुजरातमधील गोधरामध्ये, फेब्रुवारी २००२ मध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला. या घटनेमुळे संपूर्ण देशात राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटले होते. गोधरा रेल्वे स्टेशनवरून निघालेली साबरमती एक्सप्रेस चेन ओढून थांबवण्यात आली होती. त्यानंतर या ट्रेनच्या एका डब्ब्याला आग लावण्यात आली होती. या आगीमध्ये, ५९ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
साबरमती एक्सप्रेसमधील घटनेबद्दल आजही समाजाच्या घटकांमध्ये वेगवेगळे मतमतांतरे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात मोठी दंगल उसळली होती. याच संपूर्ण घटनेवर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार त्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या ट्रेलरमधून प्रेक्षकांना सत्य उघडकीस आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ट्रेलरबद्दल सांगायचे तर, ट्रेलरची सुरूवात विक्रांत मेस्सीने होते. विक्रांत मेस्सीने चित्रपटात एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. जो एका इंग्रजी चॅनलमध्ये काम करत असून तो संपूर्ण हिंदी भाषिक असल्याचा दिसत आहे.
इंग्रजी चॅनलमध्ये काम करत असताना गुजरातमध्ये गोधरा हत्याकांड घडते. आणि या घटनेने अख्खा देश हादरतो. या हत्याकांडाचं कव्हरेज कव्हर करण्यासाठी विक्रांत आणि रिपोर्टर जाते. विक्रांत कॅमेरामन असतो, तर रिद्धी इंग्रजी महिला पत्रकार असते. बातमी कव्हर करत असताना महिला पत्रकार खोटी बातमी सांगते, असं त्याला वाटतं. ही घटना कशी घडली ? कोणी घडवली ? घटनेचा मुख्य सुत्रधार कोण ? अशा एक ना अनेक प्रश्नांचे उत्तरं माहित असतानाही सांगितलं जात नाहीये. माध्यम सत्य लपवण्यावर भर देतेय, असं त्याला वाटतं. ही सर्व घटना पाहून विक्रांत दुसऱ्या महिला पत्रकारासोबत मिळून तो हे प्रकरण सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो.
ट्रेलरमध्ये घटनेचे सत्य उघडकीस आणताना येणारे अडथळे, भांडणं आणि विविध प्रश्न यांची झलक आपल्याला पाहायला मिळतेय. घटनेचे सत्य कशा पद्धतीने उघडकीस येणार ? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरंच कळेल. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत विक्रांत मेस्सी, रिद्धी डोग्रा आणि राशि खन्ना आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन धीरज सरना यांनी केली आहे. तर चित्रपटाची निर्मिती शोभा कपूर, एकता कपूर आणि अमोल मोहन आणि अंशुल मोहन यांनी केली आहे. झी स्टु़डिओजच्या बॅनर खाली चित्रपट संपूर्ण जगभरात येत्या १५ नोव्हेंबर २०२४ ला रिलीज करणार आहे.