(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांना ८ सप्टेंबर रोजी गोंडस मुलगी झाली. दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मी पुजेच्या दिवशी या जोडप्यानी नाव जाहीर करून दुआ पदुकोण सिंग ठेवले. अलीकडेच, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, अभिनेत्रीने तिच्या मुलीच्या नावाची घोषणा केली होती. अभिनेत्री तेव्हा पासून तिच्या मुलीसोबत वेळ घालवत आहे. परंतु आता दीपिका पदुकोण तिच्या मुलीसह स्पॉट झाली असून, दुआची पहिली झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे.
एअरपोर्टवर दीपिका मुलीसोबत स्पॉट झाली
मुलीच्या जन्मानंतर दीपिका सार्वजनिक ठिकाणी दिसली नाही. ती घरात सतत मातृत्वाचा आनंद घेत होती आणि छोट्या दुआसोबत दर्जेदार वेळ घालवत होती. पण आता दोन महिन्यांनंतर चाहत्यांना दीपिका आणि दुआची पहिली झलक पाहायला मिळाली. अलीकडेच हे जोडपे मुंबईतील कलिना विमानतळावर दिसले, ते कुटुंब सुट्टीवर गेले असं वाटते आहे.
हे देखील वाचा- Bigg Boss 18 : या खेळाडूचा बिग बॉसच्या घरातून पत्ता कट, पत्नीने केलेलं कृत पडलं महागात
बाबा रणवीरसोबत लहान दुआने केले ट्विनिंग
दीपिका पदुकोणने साधा टॉप घातला आहे, तर रणवीर सिंग गुलाबी ट्रॅक हुडीमध्ये दिसला. त्याचा पोशाख दुआशी जुळत होता. आईच्या खुशीत असलेली दुआ गुलाबी रंगाची पँट परिधान केलेली दिसली. जरी तिचा चेहरा पूर्णपणे झाकलेला असला तरी तिची छोटी झलक पाहून चाहत्यांना आनंद होत आहे. यावेळी रणवीर सिंगची आई अंजू भवनानीही त्याच्यासोबत होती. पापाराझींनी पहिली झलक आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.
सोशल मीडियावर मुलीचे नाव केले जाहीर
दीपिका आणि रणवीरच्या दुआची ही पहिलीच दिवाळी होती. अभिनेत्रीने अद्याप गोंडस मुलीचा चेहरा उघड केला नाही आहे. पण लक्ष्मीपूजनाच्या खास प्रसंगी त्याने आपल्या घरातील लक्ष्मीच्या पायाचा एक अतिशय सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करून तिचे नाव उघड केले. या फोटोमध्ये दुआ पारंपारिक कपडे परिधान करताना दिसत होती. तिने लाल रंगाचा सलवार सूट घातला होता.
हे देखील वाचा- प्रेम आणि महत्त्वाकांक्षेचा हृदयस्पर्शी प्रवास ‘पैठणी’मध्ये दिसणार, ZEE5 करणार ही नवी मालिका प्रदर्शित!
इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना सिंघम अगेन अभिनेत्रीने लिहिले, “दुआ पदुकोण सिंग. दुआ म्हणजे प्रार्थना कारण ते आमच्या प्रार्थनेचे फळ आहे. आमचे हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेले आहे. दीपिका आणि रणवीर.” असे लिहून अभिनेत्रीने आपल्या मुलीचे नाव जाहीर केले आहे.