फोटो सौजन्य - कलर्स सोशल मीडिया
बिग बॉस 18 – करणवीर मेहरा विरुद्ध विवियन डिसेना : बिग बॉस 18 वेगाने जात आहे, या सीझनचे 10 आठवडे पूर्ण झाले आहेत. बिग बॉस या वादग्रस्त टीव्ही शोची खास गोष्ट म्हणजे यामध्ये दिसणाऱ्या बहुतांश स्पर्धकांना घरातून बाहेर पडल्यानंतरही ओळख मिळते. मात्र, सलमान खानच्या शोमध्ये मोठ्या पडद्यावरील स्टार्सही सहभागी होतात. बिग बॉस घरामधील मैत्री आणि शत्रुत्व शोच्या बाहेरही सुरूच आहे. बिग बॉस 18 मध्ये बाहेर पडल्यानंतर अलीकडेच तजिंदर सिंग बग्गा बिग बॉसच्या घरामधून मागील आठवड्यामध्ये घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर आता कालच्या भागामध्ये घरातल्या सगळ्या सदस्यांना बिग बॉसने नॉमिनेट केले आहे. श्रुतिका घरातली नवी टाइम गॉड आहे त्यामुळे ती या आठवड्यामध्ये सुरक्षित आहे.
आता बिग बॉसच्या सोशल मीडिया अकाऊंवर नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना यांच्यामध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळत आहे. यावेळी करण विवियनला जाऊन म्हणतो की, आज बोलणार आहेस का? यावर विवियन म्हणतो की, जेव्हा मला वाटेल तेव्हा मी बोलेल, काही महत्वाचं असेल तेव्हा तुला सांगेल. यावर करण म्हणतो की, आपण तरी आपल्या बोलण्यामध्ये स्पष्ट राहू, जर आपण आपल्या मैत्रीला मैत्री समजत नाही आहोत तर. यावर विवियन म्हणतो की, मी तुला एका वाक्यामध्ये सांगू का? तू माझ्यासाठी काही महत्वाचा नाही आहेस.
Bigg Boss 18 : दिग्विजय राठीला घराबाहेर काढल्यानंतर चाहते संतापले! म्हणाले – लाडल्याला आताच ट्रॉफी…
यावर करणवीर मेहरा म्हणतो, जर मी तुझ्यासाठी महत्वाचा नाही आहे तर मग माझं नाव नॉमिनेशनमध्ये का आलं मी तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. जे लोक माझ्यासाठी महत्वाचे नाही आहेत ते माझ्यासमोर दिसत नाहीत मला. पुढे तो म्हणतो की, किती कॉल मला तू आतापर्यत केले आहेत मागील १२ वर्षांपासून शेवटचा कॉल कधी केला होतास? यावर विवियन म्हणतो की, जेव्हा तू खतरो के खिलाडी जिंकला होतास तेव्हाच केला होता. यावर करण संभाषण बोलून दाखवतो आणि म्हणतो की, एवढंच संभाषण झालं आहे. आता आपण बिग बॉसच्या घरामध्ये आहोत आणि हा एक आपला प्रवास आहे, यावर विवियन म्हणतो की, तू याला रबरासारखा का खेचत आहेस.
यावर इशा सिंह म्हणतो की, तुम्ही दोघांनी सांगितलं आहे तुम्ही दोघे एकमेकांना पसंत करत नाहीत मग आता यावर कशाला स्पष्टता हवी आहे. यावर करण म्हणतो की, जर असं आहे तर मग त्याने बोलायला पण नाही पाहिजे की मला तुझ्याशी बोलायचं आहे.
Promo: It’s Karan Veer Mehra vs Vivian Dsenahttps://t.co/Iu0Y39nK0T
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 20, 2024