मुंबई: मराठी नाट्यसृष्टीत आता वेगवेगळ्या विषयांवर आधारित नाटक सादर होत आहेत. ज्याला प्रेक्षकांचीही पंसती मिळते. मात्र विनोदी नाटकांचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. या नाटकांना तुफान प्रतिसाद मिळत असतो. विनोदी नाटकांच नाव घेतलं तर काही वर्षापुर्वी मराठी रंगभुमीवर आलेलं वस्त्रहरण (Vastraharan Marathi Natak) हे नाटक कुणी कसं विसरणार. अभिनेती मच्छिंद्र कांबळी (Machhindra Kambli) यांच्या अफलातून अभिनयानं नटनलेलं हे धमाल विनोदी नाटक चांगलच लोकप्रिय ठरलं होतं. आता नाटकाबाबत रसिक प्रेक्षकांसाठी एक मोठी अपडेट आहे. या नाटकाचे आजवर ५,२५४ प्रयोग झाले असून, लवकरच या नाटकाचा ५ हजार २५५ वा प्रयोग सादर होणार आहे.
[read_also content=”अशोक सराफ यांना ‘या’ दिवशी दिला जाणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तारीख ठरली! https://www.navarashtra.com/movies/ashok-saraf-to-be-conferred-maharashtra-bhushan-award-on-22-february-nrps-508097.html”]
मच्छिंद्र कांबळी यांचे हे नाटक 16 फेब्रुवारी 1980 मध्ये रंगभूमीवर आले होते. या नाटकाची लोकप्रियता आजही कायम आहे. या नाटकाने व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. या नाटकाला 16 फेब्रुवारी 2024 रोजी 44 वर्षे पूर्ण झाली. हे नाटक पुन्हा एकदा रंगभुमीवर सादर केलं जाणार असुन रिपोर्टनुसार, आजच्या सेलिब्रिटी कलाकारांच्या संचात या नाटकाचे मोजके ४४ प्रयोग केले जाणार आहेत.
१६ फेब्रुवारी १९८० साली कै. मच्छिंद्र कांबळी यांनी, गंगाराम गवाणकर लिखित ‘वस्त्रहरण’ या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडवलेल्या आणि अनेक दिग्गजांकडून वाहवा मिळवणाऱ्या ‘वस्त्रहरण’ या अजरामर कलाकृतीला १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी ४४ वर्षं पूर्ण झाली. या निमित्तानं हे नाटक पुन्हा रसिकांच्या भेटीला येत आहे. मार्च अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे नाटक रंगभूमीवर येणार असून, यातील कलाकार कोण असतील याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्की असेल.
या नाटकाचे निर्माते प्रसाद कांबळी यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ”वस्त्रहरण’ला यंदा १६ फेब्रुवारी रोजी ४४ वर्षं पूर्ण झाल्याच्या त्या निमित्तानं हे नाटक पुन्हा येत आहे. नव्या संचात या नाटकाचे ४४ प्रयोग होतील. या नाटकात चमकणाऱ्या संभाव्य कलाकारांशी बोलणी सुरू आहेत. एकदा नावं ठरली की तालमी सुरू होतील. नाटकाचा ८०० वा, एक हजारावा आणि ५ हजारावा प्रयोग मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य स्वरुपात षण्मुखानंद सभागृहात करण्यात आला होता. त्याचप्रमाणे ५ हजार ३०० वा प्रयोगही करण्याचा विचार सुरू आहे.’






