(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आदित्य धर यांचा “धुरंधर” हा चित्रपट, जो वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित आहे, तो पाकिस्तानमधील दहशतवादाविरुद्ध, विशेषतः कराचीच्या लियारी टोळ्यांविरुद्ध भारताच्या लढाईचे अर्ध-काल्पनिक वर्णन आहे. चित्रपटातील अनेक पात्रे वास्तविक लोकांवर आधारित आहेत. या सिनेमात रणवीरने मेजर मोहित शर्मा या पाकिस्तानात भारतीय गुप्तहेर बनून राहिलेल्या भारतीय लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तर सिनेमात अभिनेता संजय दत्त पाकिस्तानी पोलीस अधिकारी चौधरी अस्लम खानच्या भूमिकेत आहे. पण धुंरधर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चौधरी अस्लम खानची पत्नी नोरीन यांनी रणवीरच्या सिनेमातील काही डायलॉगवर नाराजी व्यक्त करत कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.
डायलॉग पाकिस्तानच्या पॉडकास्टवर बोलताना नूरीन या म्हणाल्या की, ”१९९० च्या दशकात खलनायक पाहिल्यापासून त्यांचे पती संजय दत्तचा फॅन होते आणि त्यांना विश्वास होता की अभिनेता त्याच्या व्यक्तिमत्त्वाला न्याय देईल. पण त्यांना एक तक्रार होती. संजय दत्त माझ्या पतीच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देतील याची मला खात्री आहे”. ‘धुरंधर’ सिनेमात संजय दत्तने साकारलेल्या एसपी चौधरी अस्लम खान यांच्या व्यक्तिरेखेची ओळख करून देताना सैतान आणि जीन यांची संतती असे शब्द वापरण्यात आले आहेत.”
kanika kapoor Viral Video : लाईव्ह कॉन्सर्टमध्ये कनिका कपूरसोबत चाहत्यानं थेट…., व्हिडिओ पाहून अनावर होईल राग
धुरंधरमधील या वाक्यावर चौधरी अस्लम खानची पत्नी नोरीन यांनी आक्षेप घेतला आहे,”आम्ही मुस्लिम आहोत आणि असे शब्द केवळ असलमचाच नाही तर त्याच्या आईचाही अपमान करतात, जी एक साधी, प्रामाणिक महिला होती. जर मला असे वाटत असेल की चित्रपटात माझ्या पतीला नकारात्मक पद्धतीने दाखवण्यात आले आहे किंवा त्याच्याविरुद्ध कोणताही प्रचार करण्यात आला आहे, तर मी निश्चितपणे सर्व कायदेशीर कारवाई करेन. भारतीय चित्रपट निर्मात्यांना पाकिस्तानची बदनामी करण्याशिवाय दुसरा कोणताही विषय सापडत नाही हे विचित्र आहे.”






