विद्या बालनचे कमालीचे ट्रान्सफॉर्मेशन (फोटो सौजन्य - @balanvidya Instagram
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा एक नवीन स्टाईल लुक पाहायला मिळाला आहे. तिने एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे जिथे तिची नवीन हेअरस्टाईल, केसांचा रंग आणि बोल्ड लूक सर्वांचे मन जिंकत आहे. 46 वर्षाच्या विद्याने तिच्या लुकमध्ये इतका बदल केला आहे की तिचा लुक पाहून चाहते अवाक् झाले आहेत आणि ती सध्या 26 वर्षाची असल्यासारखी दिसत आहे असंही अनेकांनी म्हटलं आहे.
तिने द पीकॉक मासिकाच्या जुलै आवृत्तीसाठी हे फोटोशूट केले आहे. हे फोटो पाहून चाहते अत्यंत वेडेपिसे झाले आहेत. कारण तिचा हा लुक लोभसवाणा आणि अगदी नजर न हटण्यासारखा आहे. विद्या बालनने मासिकाच्या मुखपृष्ठासाठी उत्तम पोझ दिल्या आहेत आणि सर्वांचे मन जिंकून घेतले आहे. तिचे केस तिच्या लुकमध्ये सौंदर्य वाढवत आहेत. तिने तिचे केस लहान केले आहेत आणि रंगवले आहेत.
विद्या बालनचा लेटेस्ट लुक
अभिनेत्री विद्या बालन गेल्या काही वर्षापेक्षा खूपच बारीक दिसत आहे. तिने एक वेगळेच फोटोशूट केले असून काही वेळातच व्हायरल झाले आहे. या डीप नेक पिंक गाऊनमध्ये ती तरूण अभिनेत्रींनाही मागे टाकत आहे. या डिझायनर आउटफिटसह, तिने तिच्या गळ्यात नेकपीस घातला आहे आणि तिच्या पोझमुळे चाहत्यांना खुष केले आहे.
कोण आहे अर्चना पूरण सिंहची होणारी सून? मुलगा आर्यमन सेठीने स्वतः केलं नातं कन्फर्म
सेलिब्रिटींनी केले कौतुक
विद्या बालनच्या आत्मविश्वासामुळे हे शूट यशस्वी झाले. डॉली सिंग, एली अवराम ते दिया मिर्झा, तृप्ती डिमरी आणि शबाना आझमी यांसारख्या सेलिब्रिटींनीही विद्या बालनच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आणि हे फोटो जबरदस्त असल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी अनेक युजर्सनेही प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटले की ती खूप सुंदर दिसत आहे, तर काहींनी म्हटले की ती पूर्वीपेक्षा खूपच बारीक झाली आहे. एकाने प्रतिक्रिया दिली आहे की, ‘विद्याच्या सौंदर्याला आता खरा न्याय मिळाला आहे’, तर अनेकांनी तिच्या सौंदर्याची भरभरून स्तुती केली आहे. तर 2005 मध्ये जशी विद्या दिसत होती तशीच दिसत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. अनेक अभिनेत्रींनी तिच्या सौंदर्याची स्तुती करत तिला प्रोत्साहन दिले आहे.
विद्या बालनचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
विद्या बालनचे काही वर्षांपूर्वी खूपच वजन वाढले होते ज्यामुळे ती प्रचंड ट्रोलही झाली होती. मात्र भुलभुलैया ३ च्या चित्रिकरणापासून तिने आपल्या तब्बेतीत प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन केले आहे आणि आता तर या फोटोशूटनंतर ती अधिक सुंदर दिसत असल्याचेही अनेकांनी म्हटलं आहे. तिने जबरदस्त काम केले असून आपल्या दिसण्याकडे अधिक लक्ष दिले असल्याचंही दिसून येत आहे.
निधनानंतर Saroja Devi यांची इच्छा झाली पूर्ण, पाच वर्षांपूर्वी ‘ही’ अनोखी इच्छा केली होती व्यक्त