फोटो सौजन्य - Social Media
या ३० नाट्यांपैकी जे. आर. डी. टाटा स्कूलची ४ नाटके विशेष निमंत्रित स्वरूपात सादर होणार असून ती स्पर्धात्मक गटात समाविष्ट नसतील, अशी माहिती महोत्सव प्रमुख प्रा. मधु जाधव, निमंत्रक प्रशांत गावंडे आणि प्रसिद्धीप्रमुख प्रदीप खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दररोज सकाळी ९ वाजता नाट्यप्रयोग
स्पर्धेतील प्रयोग दररोज सकाळी ९ वाजता सुरू होणार असून, रोज सरासरी ८ ते १० नाटकांचे सादरीकरण केले जाईल. स्पर्धेचे परीक्षण नाट्यक्षेत्रातील तज्ज्ञ गिरीश फडके, धनंजय सरदेशपांडे आणि यतीन माझीरे करणार आहेत. स्पर्धेचा उद्घाटनप्रयोग गेल्या वर्षी विश्वास करंडक जिंकणाऱ्या प्रभात किड्स स्कूलच्या नाटकाने होणार आहे. उत्कृष्ट सादरीकरणासाठी प्रथम १५,००० रुपये आणि द्वितीय ११,००० रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार (दि. १३) सायंकाळी पार पडणार असून, तो अकोल्याचे मूळचे रहिवासी, आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचे परीक्षक आणि चित्रपट संकलक विनय वैराळे यांच्या हस्ते होईल. यापूर्वी शहरातून विश्वास करंडकाची भव्य फेरी काढण्यात येईल. या फेरीत मागील वर्षातील स्त्री-पुरुष विजेते सहभागी होतील. मागील वर्षी गटात उत्कृष्ट कलावंत म्हणून प्रथम पुरस्कार मिळवलेल्या रुद्र कुकडकर (इंड्यूवीला पब्लिक स्कूल, पातुर) आणि अनया कुन्हे (आरडीजी पब्लिक स्कूल, अकोला) यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येईल.
आयोजनात विविध समित्यांचा सहभाग
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. मधु जाधव, प्रशांत गावंडे, प्रदीप खाडे यांच्यासह प्रदीप अवचार, अशोक ढेरे, नीलेश गाडगे, अनिल कुलकर्णी, विष्णू निंबाळकर, प्रतिभा फोकमारे, स्नेहल गावंडे, गीताबाली उनवणे, रितेश महल्ले, संदीप शेवलकर, अंकुश इंगळे आदी कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत. आयोजकांनी समस्त रसिक नागरिकांना या तीन दिवसीय बालनाट्य महोत्सवाचा मनसोक्त आस्वाद घेण्याचे आवाहन केले आहे.






