फोटो सौजन्य - Social Media
दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांनी मराठी जेवणाबाबत केलेले वादग्रस्त विधान फार चर्चेत आले होते. Curly Tales या प्रसिद्ध युट्युब चॅनेलने घेतलेल्या एका मुलाखतीत दिगर्शक विवेक अग्निहोत्री यांनी वक्तव्य केले होते की,”मराठी जेवण म्हणजे गरिबांचे जेवण असते.” या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील तसेच राज्याबाहेरील अनेक मराठी भाषिक पेटून उठले. विवेकला सोशल मीडियावर सर्वीकडे ट्रॉल करण्यात आले.
मुळात, विवेकच्या या विधानाने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. परंतु या सर्व ट्रॉलिंगवर विवेकने त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्याचे असे म्हणणे आहे की त्याने ते विधान फक्त एक मस्ती म्हणून दिले होते.
मुलाखतीदरम्यान Curly Tales ने अभिनेत्री पल्लवीला विवेकला कोणत्या मराठी खाद्यपदार्थांशी ओळख करून दिली होतीस? अशी विचारणा केली असता. त्यावर विवेकने उत्तर दिले होते की,” मी दिल्लीचा आहे. मला तिथे झणझणीत आणि मसालेदार खाण्याची सवय होती. इथे पल्लवीने मला वरण खायला लावले होते ज्यात मीठही नसते. तेव्हा मला अगोदर वाटायचे की हे गरिबांचे जेवण आहे.” यावर नेटकरी फार संतापले होते.
काही नेटकऱ्यांचे असे म्हणणे होते की, “विवेकला झणझणीत हवंय ना तर त्याला कोल्हापूरचा झणझणीत ठेचा खाऊ घाला. मसालेदार हवंय ना तर तांबडा पांढरा रस्सा खाऊ घाला. महाराष्ट्रात फक्त वरणच खाल्लं जात नाही, असं त्या विवेकला आधी समजवा.”
अनेक टीका झाल्यांनतर विवेकने त्याचे स्पष्टीकरण एका दुसऱ्या मुलाखतीत जाहीर करत म्हणाला आहे की,” Curly Tales सोबत संवाद करत असताना पल्लवीने मला काय मराठी खाद्यपदार्थ खाण्यास दिले यावर केलेले माझे विधान फार चर्चेत आले. त्यावर फार टीकाटिपण्ण्याही झाल्या. पण मी तेव्हा एक हेही विधान केले होते की पुढे जरा मोठा झाल्यावर मला अक्कल आली अन् मला कळाले की महाराष्ट्रीय खाणे हे सर्वात पौष्टिक खाणे आहे. आरोग्यसाठी फार सुलभ असे जेवण असते.” त्याने सांगितले की आता त्याला वरण भात फार आवडते आणि त्याला कोणत्याही वादात आता अडकायचे नसल्याचे त्याने त्या मुलाखतीत जाहीर केले आहे.