(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘साथ निभाना साथिया’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतील जुनी गोपी बहू विवाहबंधनात अडकली आहे. जिया मानेकने टीव्ही अभिनेता वरुण जैनसोबत लग्न केले आहे. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जियाने स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत आणि तिच्या चाहत्यांना लग्नाची आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीला सगळे शुभेच्छा देत आहेत.
पोस्टद्वारे चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
जिया मानेक बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीतून गायब आहे. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. साथ निभाना साथिया फेम अभिनेत्रीने प्रसिद्ध टीव्ही अभिनेता वरुण जैनसोबत ७ फेरे घेतले आहेत. जिया आणि वरुणने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करताना एक सुंदर कॅप्शन देखील लिहिले आहे.
कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिली खास नोट
या जोडप्याने त्यांच्या इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘देवाच्या कृपेने आणि अफाट प्रेमाने, हातात हात घेऊन आणि हृदयाला हृदय देऊन, आम्ही एका नवीन आयुष्यात सुरुवात करत आहोत. पूर्वी आम्ही दोन मित्र होतो आणि आता आम्ही पती-पत्नी झालो आहोत. आमच्या सर्व प्रियजनांच्या प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी आम्ही खूप आभारी आहोत ज्यांनी हा दिवस खूप खास बनवला. आता आम्ही मिस्टर अँड मिसेस जिया आणि वरुण आहोत.’ असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे.
साऊथ विधींमध्ये केले लग्न
या जोडप्याचे फोटो पाहून असे दिसते की त्यांनी दक्षिणेकडील विधींनी लग्न केले आहे. दक्षिणेकडील वधूच्या लूकमध्ये जिया खूप सुंदर दिसते. तिने पिवळ्या रंगाची साडी घातली आहे, यासोबतच तिने सोन्याचे दागिने आणि केसात गजरा घालून तिचा वधूचा लूक पूर्ण केला आहे. जियाने हातात लाल बांगड्या देखील घातल्या आहेत. त्याच वेळी, तिचा पती आणि टीव्ही अभिनेता वरुणनेही हलक्या पिवळ्या रंगाचा पोशाख घातला होता. या दोघांचेही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच दोघांचीही जोडी सुंदर दिसत असून, चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.