फोटो सौजन्य - Social Media
2 मे 2026 रोजी ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद 4’ चा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. तर अगदी रविवारपर्यंत हा सोहळा पाहता येणार आहे. दोन दिवसाच्या या कार्यक्रमात तौफिक कुरेशी आणि आदर्श शिंदे यांच्यातील जुगलबंदी पाहणे खास ठरणार आहे, तसेच रितेश देशमुखचा आगामी सिनेमा ‘राजा शिवाजी’ 1 मे रोजी संपूर्ण देशभरात मराठी, हिंदी तसेच तेलगू भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या सोहळ्यात सिनेमाचा दिग्दर्शक आणि अभिनेता हजर असल्यामुळे रितेशची उपस्थितीही महत्वाची ठरणार आहे.
‘Mi Honar SuperStar : Chhote Ustad 4’ या कार्यक्रमाला यंदाचे Top 6 स्पर्धक मिळाले आहे. कोल्हापूरची शुभ्रा खाडे, ठाण्याचा अर्णव बोपलकर, नांदेडची वीरा हाक्के, नाशिकची अस्मिता गाडेकर, पुण्याचा गंधर्व चामनर तसेच ईशानी हिंगे यंदाच्या पर्वातील TOP 6 स्पर्धक आहेत. या 6 जणांमध्ये अंतिम फेरी रंगणार असून, दोन दिवसांच्या या महासंग्रामाअखेरीस महाराष्ट्राला यंदाचा ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद 4’ चा विजेता मिळणार आहे.
Bigg Boss Marathi 6 सह ‘या’ ही कार्यक्रमाने दिला निरोप
महाराष्ट्राच्या मातीत रुजू झालेला Bigg Boss Marathi 6 संपला आणि तन्वी कोलतेने यंदाची बाजी मारली. त्यांनतर 27 एप्रिल रोजी आदिनाथ कोठारे दिग्दर्शित मालिका ‘नशीबवान’चा शेवटचा एपिसोड प्रदर्शित करण्यात आला. अखेर ‘Mi Honar SuperStar : Chhote Ustad 4’ ही मालिका अवघ्या काही दिवसांत संपणार आहे.






