‘अच्छे ने अच्छा और, बुरे ने बुरा…’ अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनसाठी लिहिली लांबलचक पोस्ट; वाचा सविस्तर
शूजित सरकार दिग्दर्शित ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिषेक बच्चन सध्या चर्चेत आहे. अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट २२ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला आहे. ह्या चित्रपटाला प्रेक्षक संमिश्र प्रतिसाद देत आहेत. सध्या सर्वत्र अभिषेकच्या अभिनयाचे कौतुक होत असून सर्वत्र चित्रपटाच्या कथनकाची जोरदार चर्चा होत आहे. एका बाप-लेकीच्या आयुष्याभोवती फिरणारं चित्रपटाचं कथानक आहे. अशात महानायक अमिताभ बच्चन यांनी मुलगा अभिषेक बच्चनसाठी खास ब्लॉग लिहिला आहे. सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांनी लिहिलेल्या ब्लॉगची चर्चा सुरु आहे.
सोशल मीडिया एन्फ्लुएंसर ते प्रसिद्ध अभिनेता, अक्षय आठरेचा प्रेरणादायी प्रवास युवकांसाठी ठरतोय आयडॉल
ब्लॉगच्या माध्यमातून बिग बी म्हणाले, “काही चित्रपट फक्त आपल्या मनोरंजनासाठी असतात. तर काही चित्रपट आपल्याला चित्रपट बनवण्यासाठी आमंत्रित करतात. मी फक्त इतकंच बोलू इच्छितो की, हा चित्रपट तुम्हाला बनवण्यासाठी आमंत्रित करतात..! ते तुम्हाला तुमच्या सीटवरून हळूवारपणे उठायला लावतो आणि अगदी हळूवारपणे थिएटरमध्ये घेऊन जातो… तुम्हाला स्क्रीनच्या आत ठेवतो आणि तुम्ही त्याकडे पाहतात. चित्रपट सोडून पळून जाण्याची इच्छाही होत नाही अभिषेक… तू अभिषेक नाही. तू चित्रपटातला अर्जुन सेन आहेस.”
वडील हरिवंशराय बच्चन यांच्या काही ओळींचा पुनरुच्चार करत बिग बी लिहितात, ” “ने अच्छा और, बुरे ने बुरा जाना मुझे, जिसकी जितनी जरूरत थी, उसने उतना ही पहचाना मुझे… पण त्यांना जे काही बोलयाचं आहे बोलूदे… असं मी सांगेल…” पण हेच मी सांगतो. माझ्यातल्या चांगल्यासाठी लोभ असू शकतो. तुमचा हावही वाईट असू शकतो, पण चांगला विचार करणं किंवा वाईट विचार करणं ही तुझी ‘गरज’ होती.. आणि हीच माझी ओळख होती.. पण मी तसा नव्हतो.. मला चांगलं समजा किंवा माझा चांगला विचार करा… इतकं तर तुम्ही मला समजू शकताना”
बिग बींनी ब्लॉगच्या शेवटच्या भागात लिहिलं की, “व्यंग, शेवटचा फटका आणि सत्य… तुम्ही कोणाला चांगलं समजता, कारण याचा विचार करणंच आपली गरज आहे. तुम्ही एखाद्याला वाईट समजता कारण ती तुमची गरजच तुमच्यासाठी आहे. चांगल्यासाठी आणि वाईटासाठी तुमची गरजच एक विचार होता. कारण तू माझ्या ओळखीला किती महत्व दिलेस!!! माझ्याबद्दल खोटे लिहिणे हे जीवनाचे शाश्वत सत्य होते. माझ्यातील चांगले दिसण्यासाठी मला तुझी गरज होती. तू मला किती ओळखलंस… आणि किती ओळखलं नाहीस.” असं देखील बिग बी ब्लॉगमध्ये म्हणाले.
प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती
अभिषेक बच्चनच्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपटाबद्दल सांगायचं तर, चित्रपटाचा बजेट ३० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २५ लाख रुपयांची कमाई, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ५५ लाख रुपयांची कमाई, तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ५० लाख रुपयांची कमाई केली आहे. याचा अर्थ चित्रपटाने तीन दिवसांत जेमतेम १.३० कोटी रुपयांचीच कमाई केली आहे.