'तुंबाड'चे सिनेमॅटोग्राफर पंकज कुमार होणार दिग्दर्शक; 'कोन्याक' मधून मांडणार जगाने कधीही न पाहिलेलं नागालँडचं चित्र
२०२४ या वर्षात रि रिलीज झालेल्या चित्रपटांमध्ये ‘तुंबाड’ चित्रपटाने सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम केला आहे. चाहत्यांना चित्रपटाची कथा इतकी आवडली की निर्मात्यांनी त्याचा दुसरा भाग जाहीर केला आहे. ‘तुंबाड’ चित्रपटाचे पीरियड ड्रामा हॉरर कथानक होते. त्याच्या यशामागे अनेक कारणे होती, त्यापैकी एक म्हणजे त्यात दाखवलेले सीन आणि ते शूट करण्याची पद्धत. ‘तुंबाड’च्या सिनेमॅटोग्राफीवर काम करणाऱ्या पंकज कपूर यांच्या मेहनतीमुळेच आज या चित्रपटाने हे स्थान गाठले आहे. आता लवकरच ‘तुंबाड’ चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर दिग्दर्शन क्षेत्रात डेब्यू करत आहे. त्यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे नावही जाहीर केले आहे.
दिग्दर्शक पंकज कपूर यांच्या अपकमिंग चित्रपटाचे नाव ‘कोन्याक’ असं आहे. ‘कोन्याक’ चित्रपटाचे कथानक उद्धव घोष लिहिणार आहेत. चित्रपटाचे कथानक एका तरुण आदिवासी योद्ध्याचे असणार आहे. ज्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची कल्पना येते. आगामी काळात कुटुंब वाचवण्यासाठी त्याला इतर जमातींच्या लोकांशी संघर्ष करावा लागतो. तो कशा पद्धतीने संघर्ष करतो, हे आपल्याला रिलीज झाल्यावरच कळेल. ‘कोन्याक’ चित्रपटाचे नागा आणि हिंदी भाषेमध्ये शूटिंग केले जाणार आहे. नागालँडमध्ये फिरत असताना ही कल्पना आपल्याला आल्याचेही उद्धव यांनी सांगितले.
सोशल मीडिया एन्फ्लुएंसर ते प्रसिद्ध अभिनेता, अक्षय आठरेचा प्रेरणादायी प्रवास युवकांसाठी ठरतोय आयडॉल
‘तुंबाड’ व्यतिरिक्त, पंकज कुमार यांनी ‘ब्रह्मास्त्र भाग एक: शिवा’ (2022), ‘तलवार’ (2015) आणि ‘हैदर’ (2014) यांसारख्या चित्रपटांचे सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहिले आहे. पंकजने OTT वर रिलीज झालेल्या राज आणि डीकेच्या ‘फर्झी’ (2023) आणि ‘गन अँड रोझेस’ (2023) वेबसीरीजचे सिनेमेटोग्राफी केली आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होणाऱ्या ‘खौफ’ या वेबसीरीजवरही पंकज कुमार यांचे काम सुरू आहे. या नव्या प्रोजेक्टसाठीही चाहते कमालीचे उत्सुक आहेत.
‘तुंबाड’ चित्रपटाच्या पहिल्या भागाचे यश पाहून ‘तुंबाड’ अभिनेता सोहम शाहने गेल्या काही दिवसांपूर्वी दुसरा भागाची घोषणा केली आहे. सोहमने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘तुंबाड’च्या सिक्वेलची घोषणा केली होती. सध्या, त्याच्या कथा किंवा रिलीजच्या डेटबद्दल कोणतेही अपडेट समोर आलेली नाही.