(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
वल्लरी पिंगा गर्ल्सच्या मदतीने घेणार मिनाक्षीचा शोध! पाहा ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेचा विशेष भाग
आलिया भट्टने पुरस्काराबद्दल व्यक्त केला आनंद
गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्कार जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त करताना आलिया भट्ट म्हणाली, “गोल्डन ग्लोब्सने सन्मानित होणे हा एक मोठा सन्मान आहे. जगभरातील चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या नवीन पिढीतील इच्छुक कलाकार आणि महिलांच्या वतीने बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. अशा वेळी जेव्हा लोक प्रभावी कथा सांगण्यासाठी जागतिक स्तरावर एकत्र येत आहेत, तेव्हा या सन्मानाचे खूप महत्त्व आहे.” असे अभिनेत्रीने सांगितले.
गोल्डन ग्लोब्सच्या अध्यक्षांनी आलिया भट्टचे केले कौतुक
या प्रसंगी, गोल्डन ग्लोब्सच्या अध्यक्षा हेलेन होहन म्हणाल्या, “आम्हाला आलिया भट्टला गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने सन्मानित करताना आनंद होत आहे. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील तिच्या असाधारण योगदानाची दखल घेतो आणि जागतिक स्तरावर चित्रपट आणि टेलिव्हिजनसाठी एक गतिमान आणि प्रभावशाली केंद्र म्हणून मध्य पूर्व, आशिया आणि त्यापलीकडे वाढत्या सर्जनशील उर्जेचे प्रतिबिंबित करतो.”
आलियाने आगामी चित्रपटाबद्दल सांगितले
महोत्सवादरम्यान, आलियाने तिच्या बहुप्रतिक्षित आगामी “अल्फा” चित्रपटाबद्दल काही संकेत दिले, माध्यमांशी बोलताना आलिया म्हणाली की, “अल्फा हा यशराज फिल्म्सच्या विश्वातील पहिला महिला ॲक्शन चित्रपट आहे, म्हणून हा एक धोका आहे कारण इतिहासात अशा प्रकारचे चित्रपट पुरुष प्रधान भूमिकांमध्ये पाहायला मिळालेले आहे. परंतु आता ही ॲक्शन भूमिका एक स्त्री साकारताना दिसणार आहे.” यशराज फिल्म्सच्या विश्वातील सातवा चित्रपट “अल्फा” मध्ये आलिया भट्ट, शर्वरी आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित, हा चित्रपट १७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.






