सध्या सोशल मीडियावर लावणी नृत्य म्हणून अश्लील डान्स करणारी गौतमी पाटील ही विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच गौतमी पाटील हिच्या सांगलीतील बेडग येथील लावणी कार्यक्रमाच्या ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. तर केवळ यामुळेच नाही तर याआधीही गौतमी लावणी सादर करताना अंगावर पाणी ओतून घेतानाचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळीही तिच्या एका वादग्रस्त इशाऱ्यामुळं तिला अनेकांच्या टीकांना सामोरे जावे लागले होते. अशातच आता अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगना मेघ घाडगे हिने देखील फेसबुक पोस्ट द्वारे गौतमीवर उपहासात्मक टीका केली आहे.
सांगलीत झालेल्या प्रकारानंतर लावणी नृत्यांगना आणि बिग बॉस फेम अभिनेत्री मेघा घाडगे यांनी गौतमीची चांगलीच कानउघाडणी केली आहे. आम्ही जे करतो ती लावणी नसून गौतमी करते ते अश्लील चाळे म्हणजेच खरी लावणी असल्याची उपहासात्मक सडकून टिका त्यांनी गौतमीवर केली आहे. अभिनेत्री मेघ घाडगे यांची फेसबूक पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली आहे. मेघा यात म्हणते, “खूप खूप धन्यवाद गौतमी पाटील. आज तुला लावणी Queen हा ‘किताब मिळाला. माफ कर खूप चूक झाली. खरंतर अशी लावणी असते हे आमच्या पूर्वज्यांना ही माहित न्हवत. का आम्हाला असं चुकीचं शिकवलं गेलं.
का या शाहिरानीं कवन लिहिली??? पुस्तकातून चुकीचा लोककलेचा अभ्यास शिकवला. कृपाकारून बंद करा हे सगळं. विनाकारण लोककलवांतांनी पिढ्यान पिढ्या कलेच्या नावाखाली पुरस्कार घेत गेले. आत्ता माझे डोळे उघडले. मीही या पुढे साडीचा पदर अंगावर घेणार नाही. पायाखालून कमरेपर्यंत येईल तेवढी साडी, परकर वर करेन आणि पाण्याची बाटली घेऊन अंगावर ओली चिंब होईपर्यंत ओतेन”.
पहा मेघा घाडगेची संपूर्ण पोस्ट :
पुढे मेघा घाडगे म्हणाली की, “मला तुझी शिष्य बनवशिल का?? कारण आम्हाला ही जगायच आहे . कलेनी पोट भरत नाही हे कळून चुकलंय. घुंगरू, शालू.. विकणे आहे .. please DM करा. पोटासाठी नाचते मीं परवा कोणाची … Love youuuu गौतमी” अशी पोस्ट मेघा घाडगेने लिहिली आहे. यानंतर त्यांनी फेसबूक लाइव्ह घेत तिची बाजू घेणाऱ्यांचीही आणि गौतमीचाही चांगलाच समाचार घेतला.