Poracha Bajar Uthala Ra Song Out Now
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपट येत्या २५ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. पोस्टर, टीझर आणि ट्रेलरनंतर आता चित्रपटातील आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. नुकतच या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीझ करण्यात आलं आहे. रिलीज होताच चित्रपटातील गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पुन्हा एकदा सिनेप्रेमींना भुरळ घालायला ‘झापुक झुपूक’ चित्रपटातलं नवं रोमँटिक गाणं ‘पोराचा बाजार उठला रं’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
संकर्षण कऱ्हाडेची मित्रासाठी खास पोस्ट; म्हणाला, “तो कायमच माझ्यासोबत…”
‘झापुक झुपूक’ हे टायटल साँग गेल्या काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं होतं. गाण्याला प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दमदार प्रतिसाद दिल्यानंतर आता दुसरं गाणं रिलीज झालं आहे. सूरज चव्हाण ,जुई भागवत आणि इंद्रनील कामतवर चित्रीत या गाण्यात या तिघांचा रोमॅन्टिक अंदाज पहायला मिळतोय. गाण्यात प्रेमाचा त्रिकोण आपण पाहू शकतो. अभिनेत्री जुई वर सूरज आणि इंद्रनीलचा जीव जडलाय. जुईची दोघांसोबत अफलातून केमिस्ट्री पहायला मिळते जी खूप सुंदर दिसत आहे. पण विशेष म्हणजे जुई चा शिफॉन सारी मधला कातिल लूक आकर्षणाचा विषय ठरतोय. या गाण्याचे बोल आणि त्याची चाल प्रेक्षकांना खिळवून ठेवतेय.
“हा कुठला इतिहास आहे?”, आस्ताद काळेच्या ‘छावा’ चित्रपटाबद्दलच्या पोस्ट व्हायरल; केली थेट टीका
गाण्याचा हुकस्टेप सुद्धा सर्वांना थिरकवणारा आहे. कलाकार आणि संगीत सोबतच या गाण्याचं चित्रीकरण सुद्धा तितकच सुंदर आहे. ह्या गाण्याला करण सावंत ह्यांनी गायलं आहे. तर संगीत आणि बोल कुणाल करण ह्यांचं आहे. ‘पोराचा बाजार उठला रं’ हे गाणं रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. गाणं पाहून सिनेरसिकांची ‘झापुक झुपूक’ सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
चित्रपटात सूरज चव्हाण ,जुई भागवत आणि इंद्रनील कामतसह हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर आणि मिलिंद गवळी सारखे एक से बढकर एक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित “झापुक झुपूक” सिनेमा २५ एप्रिल पासून प्रदर्शित होणार आहे !!