भारतातील सर्वात मोठा स्वदेशी व्हीडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि बहुभाषिक कथाकार, आगामी डायरेक्ट-टू-डिजिटल, ‘रौतू का राज़’ची घोषणा करताना रोमांचित आहे. झी स्टुडिओज आणि फाट फिश रेकॉर्ड्स निर्मित आणि आनंद सुरापूर दिग्दर्शित ‘रौतू का राज़’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी इन्स्पेक्टर दीपक नेगीच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या रहस्यमय थरारपटात राजेश कुमार, अतुल तिवारी आणि नारायणी शास्त्री यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत. हे कथानक उत्तराखंडमधील रौतू की बेली या नयनरम्य गावावर आधारित आहे. मागच्या वर्षी 54 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) या सिनेमाचा गाला प्रीमियर झाला होता, जिथे या कलाकृतीचे जोरदार स्वागत झाले आणि आता 28 जून रोजी ओटीटी प्रीमिअरसाठी सज्ज आहे.
दीड दशकाहून अधिक काळापासून खुनाची एकही घटना न अनुभवलेल्या ‘रौतू का राज़’ येथील अंध शाळेतील वॉर्डनच्या रहस्यमय मृत्यूने ग्लानीत असलेले गाव हादरते. या खुनाभोवती कथानक फिरताना या मध्ये दिसणार आहे. येथेच एसएचओ दीपक नेगी उर्फ नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या टीमचा प्रवेश होतो. कारण त्यांना या दुर्मिळ आणि हाय-प्रोफाइल हत्येचा तपास सोडवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. या सिनेमात एसएचओ दीपक नेगी (नवाजुद्दीनने साकारलेली भूमिका) आणि उपनिरीक्षक डिमरी (राजेश कुमारने साकारलेली भूमिका) यांच्यातील एक आगळीवेगळी तसेच आनंदी मैत्री दाखवण्यात आली आहे. या खुनाची उकल करण्याची जबाबदारी दोघांवर असल्याने आळशी अवस्थेतून बाहेर यावे लागते. खुनाचा आतापर्यंतचा सर्वात आळशी तपास उलगडणारा एक गूढ थरार गोष्ट यामध्ये पाहायला मिळणार आहे.
झी स्टुडिओ’चे चीफ बिझनेस ऑफिसर उमेश केआर बन्सल म्हणाले,’रौतू का राज़’ हा केवळ एक सिनेमा नसून एका रोमांचक गूढतेच्या पार्श्वभूमीवर मानवी भावनांचा शोध आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नेतृत्वाखाली, प्रेक्षक शक्तिशाली आणि सूक्ष्म अशा दोन्ही प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा करू शकतात. ZEE5 सोबत भागीदारीत ही मनोरंजक कथा सादर करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. हे कथानक अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवेल हा विश्वास वाटतो”. असे ते म्हणाले.
दिग्दर्शक आणि निर्माते आनंद सुरापूर म्हणाले, “रौतू का राज़” ही एक छोट्या शहरातील कथा आहे. या कथानकात प्रेक्षकांना उत्तराखंड आणि त्याच्या आसपासच्या भागातील चित्तथरारक दृश्य दिसते. सिनेमातील आश्चर्यकारक दृश्ये, आकर्षक कथनासह, सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षक गुंतून राहील. उल्लेखनीय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी प्रतिभावान कलाकारांचे नेतृत्व करण्यासाठी आमच्यासोबत सामील झाल्याने आम्ही स्वत:ला भाग्यवंत मानतो. त्याचे अतुलनीय अभिनय कौशल्य या शक्तिशाली कथेत जीव ओतते. त्याच्या अभिनयाचा ठसा आगामी वर्षांमध्ये प्रेक्षकांच्या मनात कोरला जाईल. मी फार काही सांगत नाही, ‘रौतू का राज़’ हा रहस्य आणि जबरदस्त नाट्याने भरगच्च आहे इतकेच सांगतो. या सिनेमाचे कथानक छोट्या शहरातील जीवनाच्या गतीशी सुसंगत आहे आणि म्हणूनच, पात्रे देखील स्वतःच्या तालावर काम करतात. वास्तविक म्हणूनच हा सिनेमा इतर गूढ थरारपटांपेक्षा वेगळा ठरतो”. असे त्यांनी सांगितले.
नवाजुद्दीन सिद्दीकीने या चित्रपटबद्धल सांगितले की, ‘रौतू का राज़’ चा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या जगाची आकर्षक झलक आहे. मला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नाट्य पाहण्याची आवड आहे. हा सिनेमा एका अनोख्या वळणासह एका मनोरंजक दृश्याची सैर घडवेल, हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो. उत्तराखंडची विचित्र पात्रे, आळशीपणा; पण श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पार्श्वभूमीमुळे ‘रौतू का राज़’ हटके ठरतो. ट्रेलरमध्ये सिनेमाच्या रहस्यमय कथानकाची झलक यामध्ये दिसणार आहे. त्यातून सिनेमाच्या यूएसपीवर प्रकाश पडतो. एक हुशार पोलिस आळशी हत्येचा तपास कसा उलगडतो याची ही कथा आहे. गेल्या वर्षी इफ्फीमध्ये आमचा गाला प्रीमिअर झाला होता, जिथे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता ZEE5 वर हा सिनेमा प्रदर्शित झाल्याने, सुमारे 190 हून अधिक देशांतील ZEE5 च्या प्रेक्षकांपर्यंत ही कलाकृती पोहोचण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे”. असे नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितले आहे.