Dipping Foot In Warm Water Benefits: हिवाळ्याच्या हंगामात आपले शरीर निरोगी आणि आरामदायी ठेवणे एक आव्हान असू शकते. अशा परिस्थितीत, गरम पाण्यात पाय भिजवणे अथवा पाण्यात पाय ठेवून बसणे ही एक सोपी परंतु अतिशय प्रभावी पद्धत आहे, ज्यामुळे तुमच्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. विशेष म्हणजे या प्रक्रियेचा अवलंब करण्यासाठी कोणत्याही महागड्या उपचारांची गरज नाही. हे तुम्ही घरी सहज करू शकता. फिटनेस फ्रिक दक्षा दाभोळकरने याचे महत्त्वाचे फायदे आपल्याला सांगितले आहेत. चला जाणून घेऊया दररोज फक्त 10 मिनिटे गरम पाण्यात पाय ठेवून बसण्याचे 6 आश्चर्यकारक फायदे (फोटो सौजन्य - iStock)
तुम्हाला माहीत आहे का? गरम पाण्यात रोज तुम्ही जर पाय ठेवले तर आरोग्याला त्याचे अनेक फायदे मिळतात. गरम पाण्यात 10 मिनिट्स पाय ठेवण्याचे फायदे जाणून घ्या
गरम पाण्यात पाय ठेवून बसल्याने शरीराच्या मज्जासंस्थेला आराम मिळतो, त्यामुळे दिवसभराचा ताण आणि थकवा कमी होतो. यामुळे मनाला शांती मिळते आणि तुम्हाला आरामही वाटतो
गरम पाण्यात पाय ठेवल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे हात आणि पायांचा थकवा दूर होतो आणि शरीरात उष्णता टिकून राहते
दिवसभर काम केल्याने किंवा जास्त वेळ उभे राहिल्याने पायांना सूज येऊ शकते. कोमट पाण्यात पाय भिजवल्याने सूज आणि दुखण्यापासून आराम मिळतो. यासाठी तुम्ही पाण्यात थोडेसे रॉक मीठही टाकू शकता
जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटे कोमट पाण्यात पाय टाकून बसा. ही प्रक्रिया शरीराला शांत करते आणि चांगली झोप घेण्यास मदत करते
गरम पाण्यात पाय भिजवल्याने त्वचेची छिद्रे उघडतात, ज्यामुळे घाण आणि मृत त्वचा सहज निघून जाते. यामुळे पायांची त्वचा स्वच्छ आणि निरोगी बनते
गरम पाण्यात पाय टाकल्याने शरीराला ऊब मिळते, ज्यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. कोणत्याही औषधाशिवाय सर्दीपासून बचाव करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे