चेन्नई सुपर किंग्जच्या चाहता वर्ग खुप मोठा आहे, आज चाहत्यांसाठी दिवस खूप खास आहे. चेन्नईच्या संघाने कमालीची कामगिरी करत ५ आयपीलचे जेतेपद नावावर केले आहेत. चेन्नईच्या संघाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली अनेक विक्रम नावावर केले आहेत. त्याचबरोबर भारताच्या क्रिकेट संघाला सुद्धा धोनीने नवी दिशा दिली आहे. आजच्या या विशेष दिनी चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०१० ची ट्रॉफी जिंकली होती आणि चॅम्पियन्स लीग T20 मध्ये खेळला होता. यावेळी चेन्नईचा संघ चॅम्पियन्स लीग T20 ट्रॉफी जिंकून इतिहास रचला होता.
2010 च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सने रचला इतिहास. फोटो सौजन्य - सोशल मीडिया

चॅम्पियन्स लीग T20 चा अंतिम सामना 26 सप्टेंबर 2010 रोजी झाला. या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना वॉरियर्सशी झाला. फोटो सौजन्य - सोशल मीडिया

या स्पर्धेमध्ये चेन्नईने हा अंतिम सामना जिंकला होता. एकाच वर्षी आयपीएल ट्रॉफी आणि चॅम्पियन्स लीग T20 ट्रॉफी जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. फोटो सौजन्य - सोशल मीडिया

मुरली विजय चॅम्पियन्स लीग T20 2010 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. याशिवाय त्याने अंतिम सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारही जिंकला. फोटो सौजन्य - सोशल मीडिया

रविचंद्रन अश्विन 2010 च्या चॅम्पियन्स लीग T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्यामुळे त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. फोटो सौजन्य - सोशल मीडिया

चेन्नई सुपर किंग्सने 2014 मध्ये बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्यांचे दुसरे चॅम्पियन्स लीग T20 विजेतेपद जिंकले. फोटो सौजन्य - सोशल मीडिया






