आज आम्ही तुम्हाला 23 वर्षांपूर्वीच्या अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने इतिहास रचला होता. या चित्रपटातील गाण्यामध्ये बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अशा दोन अभिनेत्रींनी नृत्य केलं होतं. या दोन्ही अभिनेत्रींना एकत्र पाहणं हे प्रेक्षकांसाठी मेजवाणी होती. या दोन्ही अभिनेत्री अतिशय सुंदर आहेत. त्यांनी या चित्रपटात केलेले नृत्यं पाहणं म्हणजे सोन्याहून पिवळं. चला तर मग आता या चित्रपटाबाबत आणि गाण्याविषयी जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
23 वर्षांपूर्वीचा असा एक चित्रपट, ज्याचं संगीत बनवण्यासाठी लागले होते तब्बल 902 दिवस! असाही रचला इतिहास
23 वर्षांपूर्वीच्या चित्रपट देवदासमधील 'डोला रे डोला' गाणं आजही अनेकांना आवडतं. हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटातील गाण्याने अनेक रेकॉर्ड तोडले होते.
2002 मध्ये प्रदर्शित करण्यात आलेला संजय लीला भंसाली यांचा चित्रपट अनेक उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता. या चिपत्रटाला 5 नॅशनल अवॉर्ड देण्यात आले. याशिवाय या चित्रपटातील गाणं 'डोला रे डोला' ने रेकॉर्ड बनवला होता.
यूके ईस्टर्न आई न्यूजपेपरने या गाण्याला शिर्षस्थानी ठेवलं होतं. लोकांचे वोट, सिनेमॅटिक इंपॅक्ट आणि कोरियोग्राफी या सर्वांचा विचार करता या गाण्याला बॉलीवुडच्या 50 उत्कृष्ट गाण्यांमध्ये पहिल्या स्थान देण्यात आलं होतं.
'डोला रे डोला' गाणं तयार करण्यासाठी पुष्कळ पैसा खर्च करण्यात आला होता. या गाण्याची कोरियोग्राफी सरोज खान यांनी केली होती. या गाण्यामध्ये ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांनी आपल्या नृत्याने प्रेक्षकांवर जादू केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गाण्यासाठी 2.5 करोड रुपये खर्च करण्यात आले होते.
या गाण्याच्या शूटिंगदरम्यान माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांनी अतिशय जड कपडे परिधान केले होते.
या चित्रपटातील हे गाणं तयार करण्यासाठी भंसाली आणि इस्माइल दरबारला अडीच वर्षे म्हणजेच 902 दिवसांचा कालावधी लागला.