जगात अनेक रहस्यमयी ठिकाणे आहेत जी मानवाच्या कल्पनेपलीकडे आहेत. यांचे गूढ आजवर विज्ञान देखील उलगडू शकला नाही. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला जगातील अशाच ५ रहस्यमय ठिकाणांविषयी माहिती सांगणार आहोत. हि ठिकाणच्या जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेली असून अनेकांना याची फारशी माहिती नाही.
जगातील 5 रहस्यमयी ठिकाणे ज्यांचे गूढ आजतागत मानवाला सुटलेले नाही; यापुढे विज्ञानानेही मानली हार
बर्म्युडा ट्रँगल हा जगातील सर्वात धोकादायक सागरी क्षेत्रांपैकी एक मानला जातो. हे पोर्तो रिको, मियामी आणि बर्म्युडा दरम्यान पसरलेले आहे. येथून अनेक जहाजे एकतर गायब झाली आहेत किंवा क्रॅश होतात. मात्र हे असे का होते याचे कारण आजवर कुणाला कळू शकले नाही
पेरूमधील नाझ्का ,लाइन्स ही रहस्यमय रचना आहे जी फक्त वरूनच दिसते, जसे की विमान किंवा ड्रोनमधून. वाळवंटातील जमिनीवरून लहान दगड काढून हे डिझाइन तयार केले आहेत. यामध्ये प्राणी आणि वनस्पतींचे आकार दिसतात परंतु ते का आणि कोणी बनवले याचे गूढ आजवर कुणाला कळू शकले नाही
पोलंडमध्ये एक जंगल आहे जिथे पाइनची झाडे C आकारात वाकलेली आहेत. हे १९३० च्या दशकात बसवण्यात आले होते, पण त्यांचा विचित्र आकार कसा अस्तित्वात आला हे कुणालाही समजू शकले नाही. याबद्दल शास्त्रज्ञांनाही माहिती मिळालेली नाही
चेस्टनट रिज फॉल्स हा न्यू यॉर्कमधील एक धबधबा आहे, ज्याच्या मागे सतत आग जळत राहते. असे मानले जाते की हे मिथेन वायूमुळे आहे, परंतु कोणालाही याबद्दल माहिती नाही
नाम्बी वाळवंटात हजारो वर्तुळाकार ठिपके आहेत ज्यांना परी वर्तुळे म्हटले जातात. हे आकडे ११०० मैलांच्या त्रिज्येत पसरलेले आहेत. काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे वाळवीमुळे आहे, तर काहींचा असा विश्वास आहे की हा गवताच्या उत्क्रांतीचा परिणाम आहे. पण यामागील खरे सत्य मात्र कुणालाही उलगडलेले नाही