फिलीपिन्समधील सेबू सिटीमध्ये भूगर्भीय बांधकाम कोसळले: ढिगाऱ्याखाली गाडल्याने एकाचा मृत्यू, २७ हून अधिक कामगार बेपत्ता ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Cebu City landfill collapse 2026 : मध्य फिलीपिन्समधील सेबू सिटीमध्ये शुक्रवारी काळीज पिळवटून टाकणारी एक घटना घडली. बिनालीव (Binaliw) गावातील एका कचरा व्यवस्थापन केंद्रावर कचऱ्याचा अवाढव्य ढीग अचानक कोसळला. या भूगर्भीय कोसळण्यामुळे (Landslide) तिथे काम करत असलेले डझनभर कामगार आणि संपूर्ण गोदाम ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. या दुर्घटनेत एका महिला कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अद्यापही २७ ते ३८ लोक बेपत्ता असल्याने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिनालीव येथील कचरा वर्गीकरण केंद्रावर शुक्रवारी नेहमीप्रमाणे काम सुरू होते. कामगार तळाशी असलेल्या गोदामात कचरा वेगळा करण्याचे काम करत होते. दरम्यान, परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याची एक प्रचंड मोठी भिंत कमकुवत झाली आणि ती थेट गोदामावर कोसळली. हा ढीग इतका मोठा होता की, काही क्षणात संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आणि आतील कामगारांना बाहेर पडण्याची साधी संधीही मिळाली नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ढिगाऱ्यातून आठ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, ढिगाऱ्यातून काढलेल्या एका महिलेचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. प्रादेशिक पोलीस संचालक रॉडरिक मारनन यांनी सांगितले की, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी रात्रभर शोधमोहीम सुरू आहे. मात्र, सेबू सिटीचे महापौर नेस्टर आर्किव्हल यांच्या मते बेपत्ता असलेल्यांची संख्या ३८ च्या आसपास असू शकते, ज्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
LANDSLIDE AT CEBU CITY LANDFILL A landslide occurred at the Binaliw Landfill in Cebu City on Thursday afternoon, causing the collapse of the landfill management’s staff building. In a Facebook post, Cebu City Mayor Nestor Archival said that based on preliminary reports, there… pic.twitter.com/re2trr2Xn0 — The Philippine Star (@PhilippineStar) January 8, 2026
credit : social media and Twitter
दुर्घटनेच्या ठिकाणी ढिगारा उपसण्यासाठी अवजड यंत्रसामग्री आणि डझनभर बचाव कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. परंतु, पावसाने जमीन निसरडी झाली असून कचऱ्यातून निघणाऱ्या विषारी वायूंमुळे आणि दुर्गंधीमुळे बचाव पथकांना काम करणे कठीण होत आहे. हा ढिगारा इतका अस्थिर आहे की, तो पुन्हा कोसळण्याची भीती असल्यामुळे बचावकार्य अत्यंत सावधगिरीने करावे लागत आहे. पोलीस आता या ढिगाऱ्याखाली जवळची निवासी घरेही दबली गेली आहेत का, याचा तपास करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ब्रिटनच्या आकाशात ‘मृत्यूचे दूत’! विमानतळावर उतरली डझनभर सशस्त्र अमेरिकन विमाने; कोणता देश रडारवर?
या भीषण दुर्घटनेनंतर महापौरांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. “बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जाईल आणि या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन महापौरांनी दिले आहे. कचरा व्यवस्थापन केंद्रात सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन झाले होते का आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर कचरा साठवण्याची परवानगी कोणी दिली, याची चौकशी आता केली जाणार आहे.






