world Choreographers Day: नृत्याच्या तालावर जग जिंकणारे किमयागार! हालचालींतून जादू करणाऱ्या 'पडद्यामागील' हिरोंना मानाचा मुजरा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
world Choreographers Day : संगीत ऐकलं की पाय आपोआप थिरकायला लागतात, पण त्या हालचालींना शिस्त, लय आणि अर्थ देण्याचं काम करतो तो म्हणजे ‘नृत्यदिग्दर्शक’ (Choreographer). आज ९ जानेवारी, म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय नृत्यदिग्दर्शक दिन’. हा दिवस अशा सर्जनशील मेंदूंचा उत्सव आहे, जे संगीताच्या तालावर भावनांची एक अदृश्य कविता लिहीत असतात. चित्रपट असो, रंगमंच असो किंवा आजचे व्हायरल होणारे रिल्स, प्रत्येक सुंदर नृत्यामागे एका नृत्यदिग्दर्शकाची महिनाभराची तपश्चर्या असते.
आंतरराष्ट्रीय नृत्यदिग्दर्शक दिनाची निवड ९ जानेवारी रोजी करण्यामागे एक खास कारण आहे. याच दिवशी जॉर्ज बॅलँचीन (George Balanchine) यांचा जन्म झाला होता. त्यांना विसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली नृत्यदिग्दर्शक मानले जाते. त्यांनी केवळ बॅले नृत्यामध्ये क्रांती घडवून आणली नाही, तर नृत्याला एका शास्त्रशुद्ध कलेच्या रूपात जगासमोर मांडले. ‘कोरिओग्राफी’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘नृत्य-लेखन’ (Dance Writing) असा होतो आणि बॅलँचीन यांनी खऱ्या अर्थाने नृत्यातून मानवी भावनांचे दस्तऐवजीकरण केले.
भारतीय चित्रपटांत नृत्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘मास्टरजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोज खान यांनी माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांच्या नृत्यातून भारतीय स्त्रीचे सौंदर्य आणि अदाकारी जगाला दाखवली. तर प्रभू देवा यांनी आपल्या ‘मायकल जॅक्सन’ स्टाईलने भारतीय नृत्याला आधुनिक रूप दिले. आज फराह खान, गणेश आचार्य, वैभव मर्चंट आणि रेमो डिसूझा यांसारखे कलाकार पाश्चात्य आणि भारतीय लोककलांचा मिलाफ घडवून नृत्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले आहेत.
Ngayong ika-9 ng Enero, ating ipinagdiriwang ang International Choreographers Day sa buong mundo! Sila ang mga “mastermind” at malikhaing henyo sa likod ng bawat magagandang sayaw at routine na ating nakikita—mula sa pagpaplano, pagdidisenyo, hanggang sa pag-aayos ng bawat galaw… pic.twitter.com/t018Xp07qO — Radyo Pilipinas (@radyopilipinas1) January 9, 2026
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन
नृत्यदिग्दर्शक होणे म्हणजे केवळ नाचणे नव्हे, तर ते एक व्यवस्थापन (Management) आहे. एका गाण्यासाठी किंवा सादरीकरणासाठी नृत्यदिग्दर्शकाला खालील गोष्टींचा विचार करावा लागतो:
१. भावनांचे सादरीकरण: गाण्याचे शब्द आणि त्यातील भाव हालचालींतून व्यक्त करणे.
२. स्टेज क्राफ्ट: उपलब्ध जागेचा प्रभावी वापर करून नर्तकांना फिरवणे.
३. कॅमेरा अँगल: चित्रपटात कोणत्या कोनातून नृत्य जास्त प्रभावी दिसेल, याचे नियोजन करणे.
४. विद्यार्थी घडवणे: नर्तकांच्या क्षमतेनुसार त्यांना योग्य स्टेप्स शिकवणे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ब्रिटनच्या आकाशात ‘मृत्यूचे दूत’! विमानतळावर उतरली डझनभर सशस्त्र अमेरिकन विमाने; कोणता देश रडारवर?
आजच्या काळात ‘नृत्यदिग्दर्शन’ हे केवळ छंदापुरते मर्यादित राहिलेले नाही. टीव्हीवरील डान्स रिअॅलिटी शोज आणि मोठ्या इव्हेंट्समुळे या क्षेत्रात करिअरच्या प्रचंड संधी उपलब्ध झाल्या आहेत.






