Vegetables For Brain Power: तल्लख बुद्धी हवी असं कोणाला वाटत नाही. आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की आपलं मूल हुशार असावं आणि आपल्या बुद्धीने आपली अधिक ओळख व्हावी. यासाठी तुम्ही आहारात काही महत्त्वाच्या भाज्यांचा समावेश करून घेतला तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकतो. तुमची बुद्धी आणि स्मरणशक्ती अधिक वाढावी आणि उत्तम राहावी यासाठी तुम्ही हे नक्की वाचायला हवे. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी काही भाज्यांची नावे सांगितली आहेत, जी तुम्ही आहारात खायलाच हवी (फोटो सौजन्य - iStock)
आहारातील नियमित भाज्या खाल्ल्याने मेंदू तल्लख होऊन तुमची स्मरणशक्ती चांगली होण्यास मदत मिळते. कोणत्या आहेत या भाज्या जाणून घेऊया
पालकामध्ये व्हिटॅमिन के, फोलेट आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. हे सर्व पोषक तत्व मेंदूच्या पेशी निरोगी ठेवण्यास आणि स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि के हे अधिक प्रमाणात असते. ही जीवनसत्त्वे मेंदूच्या पेशींचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करतात आणि स्मरणशक्ती सुधारतात
सिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी अधिक असते. विटामिन सी हे जीवनसत्व मेंदूच्या पेशी निरोगी ठेवण्यास आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते
गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असते जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. व्हिटॅमिन ए मेंदूच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करते आणि दृष्टीदेखील सुधारते
बीटरूटमध्ये नायट्रेट्स असतात जे मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढवतात आणि स्मरणशक्ती सुधारतात, त्यामुळे याचा आहारात समावेश करून घ्यावा