Vitamins For 40+ Adults: वयाच्या 40 वर्षांनंतर शरीरात अनेक बदल घडू लागतात. हाडे कमकुवत होऊ लागतात, पचनक्रिया मंदावते आणि अनेक आजारांचा धोकाही वाढतो. या बदलांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला आपल्या आहारात काही विशेष बदल करावे लागतात. या बदलांपैकी सर्वात महत्वाचे म्हणजे आहारामध्ये विटामिन्सचा समावेश करून घेणे. चला जाणून घेऊया वयाच्या 40 नंतर कोणत्या 6 जीवनसत्त्वांची सर्वाधिक गरज असते आणि त्याचा कसा समावेश करावा. (फोटो सौजन्य - iStock)
शरीरासाठी वेगवेगळ्या विटामिन्सची गरज असते अन्यथा शरीराचा सांगाडा व्हायला वेळ लागत नाही. कोणते 6 विटामिन्स 40 नंतर खावे जाणून घ्या

40 नंतर शरीरातील Vitamin D चे उत्पादन कमी होते. म्हणून, तुम्ही आहारात मासे, अंडी, दूध आणि दही यांसारख्या व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थांचा समावेश करावा

Vitamin B12 नसा निरोगी ठेवण्यास आणि अशक्तपणा टाळण्यास मदत करते. हे जीवनसत्व मुख्यतः मांस, चीज आणि अंडी यामध्ये आढळते

40 नंतर, हाडे कमकुवत होऊ लागतात, म्हणून दूध, दही, चीज, हिरव्या पालेभाज्या आणि बदाम हे कॅल्शियमचे चांगले स्रोत समाविष्ट करून घ्यावेत

Vitamin C रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. यात अँटीऑक्सिडंट्स असून संत्री, लिंबू, द्राक्षे आणि स्ट्रॉबेरी हे व्हिटॅमिन सी चे चांगले स्रोत आहेत

ओमेगा-३ फॅटी अॅसिडमुळे हृदयरोग, मेंदूचे आरोग्य आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. मासे, अक्रोड आणि चिया बिया हे ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे चांगले स्रोत आहेत

मॅग्नेशियम हाडे मजबूत करण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि स्नायूंना आराम करण्यास मदत करते. पालक, बदाम आणि बिया मॅग्नेशियमचे चांगले स्रोत आहेत






