सर्वच किंवा साडी किंवा पार्टीवेअर ड्रेसवर सुंदर नटून थटून तयार होतात. ड्रेसला मॅचिंग होईल अशी चप्पल, मेकअप, दागिने इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. यासोबतच ड्रेसला मॅचिंग होईल असे क्लच देखील वापरले जाते. प्रत्येकालाच साडी किंवा ड्रेसवर मॅचिंग होणाऱ्या वस्तू हव्या असतात. पार्टीमध्ये इतरांपेक्षा सुंदर आणि उठावदार दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करतात. त्यामुळे तुमच्या साडी किंवा ड्रेसवर या पद्धतीचे सुंदर क्लच अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतील.(फोटो सौजन्य – pinterest)
साडी किंवा पार्टीवेअर ड्रेसवर शोभून दिसतील 'या' पद्धतीचे स्टयलिश क्लच बॅग
इतरांपेक्षा थोडे हटके आणि युनिक क्लच हवे असल्यास तुम्ही या पद्धतीचे क्लच वापरू शकता. तुमच्या पारंपरिक लुकला एथनिक लूक द्यायचा असेल तर सिल्क फॅब्रिकपासून बनवलेली पोटली बॅग क्लच तुम्ही वापरू शकता.
हेवी वर्क केलेला लेहेंगा किंवा घागरा परिधान केल्यानंतर या पद्धतीने थ्रेड वर्क केलेले क्लच तुम्ही वापरू शकता. थ्रेड वर्क केलेले क्लच कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर सुंदर दिसते.
नवरी किंवा तिच्या रिसेप्शन लूकमध्ये अधिक भर घालण्यासाठी या पद्धतीचे चमकणारे क्लच वापरू शकता. यामुळे तुमचा लुक अतिशय सुंदर आणि उठावदार दिसेल.
पारंपरिक साडी किंवा ड्रेस परिधान केल्यानंतर तुम्ही या पद्धतीचे एम्ब्रॉयडरी केलेला क्लच वापरु शकता. यावरील सोनेरी रंग आपल्या सौंदर्यात अधिक भर घालेल.
मोत्याचे वर्क केलेले सुंदर क्लच बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे पार्टी किंवा इतर कोणत्याही सोहळ्यासाठी तुम्ही या पद्धतीचे क्लच वापरू शकता.