आज आषाढी एकादशीचा मंगलमय दिवस. हा दिवस वारकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी हजारो वारकरी पायवरी करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल होत असतात. या महिन्यात जन्माला आलेल्या नवजात मुलांसाठी जर तुम्ही काही नवीन आणि गोंडस नावे शोधात असाल तर नावाची ही लिस्ट एकदा नक्की पाहा.
लहान मुलांसाठी पांडुरंगाची खास नावे
धारेश - हे नाव भगवान विष्णूचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. धारेश या नावाचा अर्थ आहे पृथ्वीचा स्वामी.
अचिंत्य - या नावाचा अर्थ अतुलनीय आणि अकल्पनीय असा आहे. भगवान विष्णूच्या उत्कृष्टतेच्या स्मरणार्थ त्यांना अचिंत्य असे नाव देण्यात आले आहे.
अच्युत - हे नावदेखील भगवान विष्णूंसाठी संबोधले आहे. या नावाचा अर्थ होतो नाश होऊ शकत नाही आणि जो अमर आहे.
ह्रदेव - शरीरातील हृदयाचा जो भाग असतो, त्याला ह्रदेव असे म्हणतात. तुमचा मुलगा देखील तुमच्या हृदयाचा एक महत्त्वाचा भाग आहे, असे मानत तुम्ही त्याला ए नाव ठेवू शकता.
नमिश - असे म्हणतात की या नावाचा त्या व्यक्तीच्या स्वभावावर फार परिणाम होतो. तुमच्या बाळाला हे नाव ठेवून तुम्ही त्याच्यात भगवान विष्णूंचे गुण मिळवू शकता.