Abhijeet Kelkar Interview About Balgandharva Role In Yogyogeshwar Jai Shankar Nrsr
बालगंधर्वांची भूमिका करायला मिळाली हे माझं भाग्यच – अभिजीत केळकर
कलर्स मराठीवरील (Colors Marathi) ‘योगयोगेश्वर जय शंकर’(Yogyogeshwar Jai Shankar) मालिकेत शंकर महाराजांच्या दिव्यत्वाचा अनुभव ज्यांनी घेतला त्या बालगंधर्वांच्या गोष्टीला सुरुवात होत आहे. या मालिकेत बालगंधर्वांची भूमिका अभिनेता अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar) साकारणार आहे. बालगंधर्वांची (Balgandharva) भूमिका करायला मिळणं हे माझं भाग्य असल्याची भावना अभिजीत केळकरने व्यक्त केली आहे.