‘लग्नानंतर होईलच फेम’ अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने साखरपुड्याचे गोड क्षण आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. होणाऱ्या नवऱ्यासह ज्ञानदाने अंगठीचा फोटोही अत्यंत आनंदाने शेअर केलाय. काही वेळापूर्वीच ज्ञानदाने मेहंदीचे रील शेअर केले होते आणि अचानक साखरपुड्याचे फोटो समोर आल्याने चाहत्यांना नक्कीच आनंदाचा धक्का बसला आहे. ज्ञानदाने अत्यंत वेगळा रंग निवडत साखरपुड्याचा हा लुक केलाय. पहा ज्ञानदाचे नवऱ्यासह साखरपुड्यातील काही फोटो (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मधील काव्या अर्थात अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. परमपूज्य शंकर महाराजांचे आशिर्वाद घेत जोडप्याने आयुष्याचा श्रीगणेशा केलाय

ज्ञानदाने अगदी सुंदर आणि आकर्षक असा लुक करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता तिचा नवरा नक्की कोण आहे हे जाणून घेण्याची नक्कीच सर्वांना उत्सुकता लागली आहे

गोल्डन साडी आणि त्यासह गोल्डन डिझाईनर ब्लाऊज मॅच करत ज्ञानदाने साखरपुड्यासाठी एक वेगळीच स्टाईल सेट केली आहे आणि ती यामध्ये अत्यंत सुंदर दिसतेय

हातात हिरव्या बांगड्या आणि मोत्यांचे सोन्याचे दागिने ज्ञानदाने यासह घातले आहेत. अत्यंत सिंपल पण तितकीच लक्षवेधी अशी तिची ही स्टाईल चाहत्यांना खूपच आवडतेय

केसांचा भांग पाडत मध्यभागी हेअरस्टाईल करत ज्ञानदाने पारंपरिक गजरा घातला आहे आणि आपल्या नवऱ्यासह खूपच आनंदाने पोझ दिल्यात

मिनिमल मेकअप आणि मिनिमल दागिन्यांमध्ये ज्ञानदाने साखरपुड्याचा हा लुक क्लासी ठेवलाय आणि तिच्यावर चाहते अभिनंदनाचा वर्षाव सोशल मीडियावर करत आहेत






