करिष्मा कपूर ५१ व्या वर्षीही तरूण अभिनेत्रींना टक्कर देतेय. तिच्या त्वचेवरून तिचे वय कळतही नाही. करिष्माने नुकतेच स्वदेश ऑनलाईनच्या इव्हेंटला उपस्थिती लावली होती आणि यावेळी गोल्डन बॉर्डरच्या ऑफव्हाईट खादी साडीत कमालीची सुंदर दिसली. करिष्माचा हा लुक स्वदेश स्टोअर लाँचच्या वेळी करण्यात आला होता. या चंदेरी साडीमध्ये करिष्माचे सौंदर्य अधिक खुललेले दिसून आले (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
करिष्मा कपूरने स्वदेश स्टोअर लाँचसाठी उपस्थिती लावली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. करिष्माच्या सौंदर्याचा जलवा पाहून सर्वच थक्क झाले

गोल्डन बॉर्डरच्या चंदेरी साडीसह करिष्माने फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज घातला असून त्यावर मागे क्लासी एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती आणि हातावरही तसे डिझाईन होते

करिष्माने नेसलेली चंदेरी साडी ही मध्यप्रदेशमधील कलाकारीचा नमुना असून मनिष मल्होत्राच्या टीमने याचे डिझाईन केले आहे

करिष्माने या साडीसह कुंदनचे कानातले घातले असून वेगळ्या डिझाईनच्या बुगडी घातल्या आहेत. या साडीसह तिचे हे दागिने अप्रतिम दिसत आहेत

करिष्माने या साडीसह अप्रतिम दिसेल अशी क्लासी बन हेअरस्टाईल केली असून केसांचा मधून भांग पाडला आहे. तिच्या उभट चेहऱ्याला ही हेअरस्टाईल सूट होते

करिष्माने यासह न्यूड मेकअप आणि मिनिमल मेकअप निवडला असून काजळ, आयलायनर, आयलॅशेस आणि न्यूड लिपस्टिक लावत लुक पूर्ण केलाय






