‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि पाश्चात्य कपड्यांपेक्षाही ती साडी आणि सलवार कमीजमध्ये आपले फोटो अधिक पोस्ट करताना दिसते. जे तिच्या चाहत्यांनाही अधिक आवडतात. रिंकूचा लोभसवाणा आणि हृदयाला एक कमालीची शांतता देणारा चेहरा चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे. सध्या रिंकूने आपले काही फोटो पोस्ट केले असून फारच कमी वेळात व्हायरल झाले आहेत. रिंकूचा हा पेहराव आपण डिकोड करूया (फोटो सौजन्य - @iamrinkurajguru Instagram)
रिंकू राजगुरू ही नेहमीच साधी, सालस आणि लोभसवाण्या पेहरावात दिसून येते आणि आता पुन्हा एकदा तिचे फोटो व्हायरल झाले आहेत
रिंकूने जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कॉम्बिनेशन असणारा पंजाबी सलवार सूट परिधान केला असून उन्हाळ्यात असा कॉटनचा ड्रेस उत्तम ठरतो. रिंकूने अत्यंत स्टायलिश पद्धतीने पोझ दिल्या आहेत
या जांभळ्या ड्रेससह रिंकूने डायमंडचे नाजूक कानातले घातले आहेत आणि गळ्यात केवळ एक साधी सोन्याची चेन घातली आहे तर अत्यंत मिनिमल दागिने ठेवत साधा लुक ठेवलाय
याशिवाय तिने हेअरस्टाईल करतानाही जास्त कोणते प्रयत्न केलेले नाहीत. नैसर्गिक असणारे केस मोकळे ठेवले असून मधून केवळ भांग पाडला आहे आणि आपल्या सौंदर्यात भर पाडली आहे
कपाळावर साधीशी टिकली लावली असून भारतीय स्त्री साधेपणातही किती सुंदर दिसू शकते हेच रिंकूने आपल्या पेहरावातून दाखवून दिले आहे
नैसर्गिक आणि अत्यंत मिनिमल मेकअप रिंकूने केला असून बेसिक फाऊंडेशन, काजळ, लायनर, मस्कारा आणि लिपग्लॉस लावत आपला लुक पूर्ण केलाय