मराठी अभिनेत्री सायली संजीव हीचा ‘कैरी’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील काही लूक समोर आले आहेत.या प्रत्येक लूकमुळे तिने चाहत्यांना भुरळ घातली आहे. या चित्रपटातील नारळी पोफळीच्या बागा’ या गाण्यात शशांक आणि सायली यांची रोमँटिक केमिस्ट्री दिसत आहे
सायली संजीवचा कैरी चित्रपटातील लूक. (फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

मराठी चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सायली संजीव सध्या आपल्या ‘कैरी या चित्रपटातील लूकमुळे चर्चेत आहे.

या फोटोमुळे सायली संजीव हिच्या सौदर्यांची चाहत्यांना भुरळ पडली आहे.मोकळे केस कानातले झुमके आणि हिरव्या बांगड्या या साधा मेकअप लूकला अधिकच खुलवत आहे. या फोटोमध्ये नवीन नवरी दिसत आहे. कपाळावर सिंदूर, हिरव्या बांगड्या तिचे सौदर्य अजूनच खुलवत आहे.

नारळी पोफळीच्या बागा’ या गाण्यात शशांक आणि सायली यांची रोमँटिक केमिस्ट्री दिसत आहे.या गाण्यातील लूक मध्ये अभिनेत्री सोज्वळ मुली सारखी साधी आणि गोड मुलगी दिसत आहे.

या फोटोमध्ये सायली संजीवची हळद होत आहे. हळदीसाठी अनेक जण जमलेली दिसत आहेत.

या फोटोत सायलीला हळद लावली जात आहे. या लूकमध्ये ती अजूनच खूलून दिसत आहे. यात तिने हातावर मेंहदी काढली आहे तर हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत.यावेळी सायलीने डार्क हिरव्या रंगाची कॅटनची साडी नेसली आहे त्यावर चॉकलेटी रंगाचा ब्लाऊज घातला आहे. गळ्यात तिने मोत्याचा हार आणि कानात झुमके घातल्याने तिचा लूक अजून सुंदर दिसत आहे.






