सायली संजीव एक गोड चेहऱ्याची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचा चेहरा अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्याशीही थोडासा जुळतो असं म्हटलं जातं. सायलीच्या चेहऱ्यावरील हाच गोडवा अनेकांना आवडतो तर तिची फॅशन स्टाईलही कमालीची सुंदर आणि अप्रमित असते. अनेकदा कॉटनच्या साडीत वा कॉटनच्या कपड्यांमध्येच सायलीचे लुक दिसून येतात. असाच एक नाव लुक सायलीने शेअर केला असून तुम्हीही हा कॅज्युअल लुक कॅरी करू शकता (फोटो सौजन्य - Instagram)
सायली संजीवने आपल्या अभिनयाने आणि आपल्या गोंडस लुकने नेहमीच चाहत्यांच्या मनात घर केलंय. तिचे कॉटनच्या कपड्यांमधील लुक तिच्या चाहत्यांना अधिक भावतात
नुकतेच सायलीने स्ट्रिप्स ड्रेसमधील फोटो शेअर केले असून तिचा हा लुक अनेकांना खूपच लाघवी वाटला आहे. तिच्या या फोटोंवर अनेक कमेंट्सचा वर्षाव होताना दिसून येत आहे
प्रिंटेड कॉटन ड्रेस घातलेल्या सायलीचा हा लुक कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरूणींसाठी नक्कीच प्रेरणात्मक आहे. सायलीने अत्यंत सहजरित्या हा लुक कॅरी केला असून तिच्या चेहऱ्यावरून नजर हटत नाहीये
सायलीने यासह काळा गॉगल लावत आपल्या लुकमध्ये एक स्वॅगही आणला आहे आणि तिच्या हास्याने यावर चारचाँद लावले असल्याचे दिसून येत आहे. सायली संजीवचा हा लुक खूपच सुंदर दिसतोय
सायलीने या ड्रेससह केवळ एक डिजीटल वॉच हातात घातले आहे आणि डीप गळा असल्याने तिने गळ्यात एक नाजूकशी चैन घालत लुक पूर्ण केलाय
सायली संजीवने यासह अत्यंत मिनिमल मेकअप ठेवला असून बेसिक फाऊंडेशन आणि न्यूड शेड लिपस्टिकचा वापर केला असल्याचे दिसून येत आहे