Amla Side Effects: आवळा हा पौष्टिकतेचा खजिना असून त्याला अमृत फळ देखील म्हणतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. आवळा हे आयुर्वेदात एक अद्भुत औषध मानले जाते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास, त्वचा चमकदार बनविण्यास आणि केस मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय पचन सुधारण्यास, कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. तथापि, आवळा सर्वांसाठी फायदेशीर नाही. त्याचे सेवन काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते, नक्की कोणत्या आजारांसाठी आवळा हानीकारक आहे जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)
आवळा हा खरं तर अनेक गुणधर्मांनी युक्त आहे. मात्र काही आजार असे आहेत ज्याचा त्रास होत असताना आवळा खाल्ल्यास त्रासदायक ठरू शकते. आवळा खाणे हे त्यांच्यासाठी एखाद्या विषाप्रमाणे असल्याचेही सांगण्यात येते
आवळ्याची चव आंबट असून त्याचे गुणधर्म आम्लयुक्त असतात. जर तुम्ही ॲसिडिटी, गॅस किंवा पोटदुखीने त्रस्त असाल तर आवळा तुमची समस्या वाढवू शकतो. त्यामुळे तुम्ही अशा त्रासांदरम्यान आवळा खाणे चुकीचे ठरते
आवळ्यामध्ये रक्तातील साखर कमी करण्याची क्षमता असते. जर एखाद्या व्यक्तीची साखर आधीच कमी झाली असेल किंवा तो मधुमेहविरोधी औषधे घेत असेल तर आवळ्याचे सेवन धोकादायक ठरू शकते
आवळ्याच्या नियमित सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. परंतु जर तुम्ही उच्च रक्तदाबासाठी औषधे घेतली तर त्याचा तुमच्या औषधांच्या परिणामकारकतेवर परिणाम होऊ शकतो आणि लवकर बरं होणार नाही. त्यामुळे आवळे खाऊ नका
आवळ्यामध्ये जास्त प्रमाणात ऑक्सलेट असते, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. किडनीच्या रुग्णांनी ते खाणे टाळावे. किडनीचा ज्यांना आजार आहे त्यांनी आवळ्यापासून चार हात लांब राहणे अधिक योग्य ठरते
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असलेले व्हिटॅमिन सी रक्त पातळ होण्याच्या प्रक्रियेला गती देऊ शकते, ज्यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो. तुम्हाला जर काही रक्ताच्या आजाराचा त्रास असेल तर आवळा न खाणे योग्य