मागील अनेक वर्षांपासून सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी कोरफड जेलचा वापर केला जात आहे. कोरफड जेल केवळ त्वचेसाठी नाही तर आरोग्य आणि केसांसाठी सुद्धा वापरले जाते. कोरफड जेलमध्ये असलेले घटक त्वचा हायड्रेट ठेवतात. याशिवाय कोरफड जेल लावल्यामुळे त्वचा अधिकच मुलायम होते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. स्किन केअर रुटीन फॉलो करताना रात्री झोपण्याआधी कोरफड जेल चेहऱ्यावर लावून झोपल्यास काही दिवसांमध्ये त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतील. चला तर जाणून घेऊया कोरफड जेल त्वचेला लावण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
रात्रभर Aloe Vera Gel चेहऱ्यावर लावल्यास त्वचेमध्ये दिसून येतील आश्चर्यकारक बदल
कोणतेही स्किन केअर प्रॉडक्ट रात्रीच्या वेळी चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचेच्या खराब पेशी दुरुस्त होतात. रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्यास त्वचा अधिकच सुंदर दिसेल.
चेहऱ्यावर वारंवार मुरूम किंवा पिंपल्स येत असतील तर इतर कोणत्याही स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी कोरफड जेल वापरावे. यामुळे पिंपल्स कमी होऊन त्वचा डागविरहित होते.
कोरफड जेलमध्ये 'अॅलोइन' नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे त्वचेचा खराब झालेला रंग सुधरण्यास मदत होते. उन्हामुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा.
त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. यासाठी रात्री झोपण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर कोरफड जेल लावून रात्रभर तसेच ठेवा. यामुळ त्वचेवर लालसरपणा कमी होईल.
कोरफड जेलमध्ये असलेले 'अँटी-ऑक्सिडंट्स' मुक्त रॅडिकल्सशी लढण्यासाठी मदत करतात. कारण मुक्त रॅडिकल्स त्वचेचे पूर्णपणे नुकसान करतात. यामुळे त्वचेचे पेशींचे नुकसान होते.