लग्न सराईच्या दिवसांना सुरुवात झाली. लग्न म्हंटल की लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासूनच तयारी केली जाते. लग्न सोहळा जवळ आल्यानंतर सगळ्यात आधी दागिन्यांची खरेदी केली जाते. नेकलेस, अंगठी, बांगड्या इत्यादी अनेक दागिन्यांची खरेदी केली जाते. त्यात मांगटीका सुद्धा प्रामुख्याने विकत घेतला जातो. मात्र अनेकदा मांग टीका खरेदी करताना मुली खूप जास्त गोंधळून जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लग्नात नवरी आणि करवलीसाठी मांग टीकाच्या काही सुंदर डिझाईन्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
नवरीसह करवलीच्या डोक्यामध्ये शोभून दिसतील 'या' सुंदर डिझाईन्सचे मांग टिक्का

साऊथ इंडियन लुक केल्यास तुम्ही या पद्धतीचा भरीव डिझाईन असलेला मांग टीका परिधान करू शकता. मांग टिक्का निवडताना त्यावर सूट होतील असे कानातले आणि गळ्यातील दागिन्यांची निवड करावी.

बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मांगटिक्के उपलब्ध झाले आहेत. साखरपुड्यात किंवा हळदीच्या साडीवर परिधान करण्यासाठी तुम्ही या पद्धतीचे मांग टीका खरेदी करू शकता.

नऊवारी साडी परिधान केल्यानंतर तुम्ही या पद्धतीचा सुंदर मांग टीका परिधान करू शकता. त्यामध्ये तुम्ही मोती किंवा नाजूक चैन असलेला मांग टिक्का खरेदी करू शकता. नऊवारी साडीवर या पद्धतीचा मांग टीका अतिशय सुंदर दिसेल.

डिझायनर लेहंगा किंवा साडी परिधान केल्यानंतर हिऱ्यांचा वापर करून बनवलेला मांग टीका परिधान केल्यास तुमचा लुक अतिशय रॉयल दिसेल. याशिवाय तुम्ही चारचौघांमध्ये अतिशय उठावदार दिसाल.

लग्नामध्ये बनारसी शालू किंवा भरीव नक्षीकाम असलेली साडी परिधान केल्यास तुम्ही या पद्धतीचा हेवी डिझाईन असलेला मांग टीका डोक्यात परिधान करू शकता. यामुळे तुमचा लुक खूप सुंदर आणि उठावदार दिसेल.






