नथ हा पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिना आहे. पूर्वीच्या काळी महिला नाकामध्ये नथ घालत होत्या. साडी नेसल्यानंतर किंवा ट्रेडीशनल कोणताही ड्रेस घातल्यानंतर नथ परिधान केली जाते. लग्नसराईच्या दिवसांमध्ये नवरीच्या नाकात नथ ही असतेच. नथ घातल्यानंतर लुक खूप सुंदर आणि उठावदार दिसतो. हल्ली अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नथ बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लग्न सराईसाठी काही सुंदर नथीच्या डिझाइन्स सांगणार आहोत. या नक्की ट्राय करून पहा.(फोटो सौजन्य-istock)
लग्न सराईसाठी सुंदर नथीच्या डिझाइन्स
मोत्याची नथ घालायला सगळ्यांचं खुप आवडते. मधोमध सोन्याची रेषा आणि बाजूने मोत्याच्या मण्यांचे गुंफण असलेली नथ लग्नात अगदी उठून दिसते.
साऊथ इंडियन लग्नामध्ये या पद्धतीची नथ घातली जाते. ही नथ घातल्यानंतर वेगळाच लुक येतो.
मोराची नथ सगळ्यांचं खूप आवडते. या प्रकारची नथ नाकात घातल्यानंतर इतरांपेक्षा थोडा वेगळा लुक दिसेल. मोराचा पिसारा असलेली नथ नाकामध्ये सुंदर दिसते.
तुम्हाला जर मोठ्या आकाराची नथ घालायला आवडत असेल तर तुम्ही या डिझाईनची नथ घालू शकता. यामुळे तुमचा लुक सुंदर दिसेल.
लग्नामध्ये नवरीच्या नाकात मोठ्या आकारची नथ असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या लग्नात या पद्धतीची तयार करून घेतलेली नथ घालू शकता. हल्ली नावाच्या आणि इतर नथ सहज तयार करून मिळतात.