जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी हळदीचा नियंत्रणात वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. यामध्ये आढळून येणारे कर्क्यूमिन आरोग्यासह त्वचेसाठी अतिशय प्रभावी ठरते. हळद ही तिच्या रंग आणि चवीमुळे ओळखली जाते. जेवणात हळद टाकल्यानंतर जेवणाला खूप सुंदर रंग आणि सुगंध येतो. याशिवाय शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला हळदीचा वापर केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
स्वयंपाक घरातील चिमूटभर हळद आरोग्यापासून ते त्वचेसंबंधित समस्यांसाठी ठरेल प्रभावी
हळदीमध्ये आढळून येणारे कर्क्यूमिन शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे शरीराला सूज, जळजळ कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात.
हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यासाठी मदत करतात, ज्यामुळे शरीराचे हानिकारक पेशीपासून नुकसान होत नाही.
जेवणातील प्रत्येक पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. यामुळे पचनक्रिया सुधारते. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी कोमट पाण्यात हळद मिक्स करून प्यावी, ज्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात.
त्वचेमध्ये होणारी जळजळ, मुरूम, पिंपल्सचे डाग, वांग इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हळदीचा फेसपॅक किंवा हळदीचा मास्क बनवून लावला जातो. यामुळे त्वचा अतिशय सुंदर आणि उठावदार दिसते.
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. हळदीचे पाणी प्यायल्यामुळे शरीराची पचनक्रिया ससुधारते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहून हृदयाचे आरोग्य चांगले राहते.