येत्या काही दिवसांतच नवीन वर्ष सुरु होणार आहे. नवीन वर्ष कशा पद्धतीने आणि कोणत्या ठिकाणी साजरं करायचं याचं प्लॅनिंग अनेकांनी सुरु केलं आहे. जर तुम्ही नवीन वर्ष साजरे करण्यासाठी योग्य ठिकाण शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला दक्षिण भारतातील 5 सर्वोत्तम ठिकाणे सांगणार आहोत, जिथे तुम्ही नवीन वर्षाची चांगली सुरुवात करण्यासाठी जाऊ शकता. येथे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा कुटूंबासोबत देखील जाऊ शकतो. ज्यामुळे तुमच्या नवीन वर्षाचं सेलिब्रेशन अविस्मरणीय ठरणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
New Year 2025: तुमच्या न्यू ईअर सेलिब्रेशनची मजा आणखी वाढवतील दक्षिण भारतातील 'ही' 5 डेस्टिनेशन्स
जर तुम्हाला नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी एखाद्या सुंदर ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही दक्षिण भारतातील या 5 ठिकाणांबद्दल जाणून घ्या, जिथून तुम्ही तुमच्या नवीन वर्षाची चांगली सुरुवात करू शकता.
उटी हे तमिळनाडूच्या निलगिरी पर्वतांमध्ये वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही तुमच्या वर्षाची सुरुवात अतिशय छान पद्धतीने करू शकाल.
कर्नाटकात असलेल्या कुर्गला भारताचे स्कॉटलँड म्हणतात. नैसर्गिक सौंदर्य आणि भव्य धबधबे असलेले हे ठिकाण नवीन वर्ष साजरे करण्यासाठी योग्य आहे.
केरळमधील समुद्र किनाऱ्यावर वसलेले मुन्नार हे एक अद्भुत पर्यटन स्थळ आहे. येथे तुम्ही समुद्राजवळील सूर्यप्रकाशाचा आनंद घेऊ शकता.
केरळचे सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोची हे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी योग्य आहे. येथे तुम्ही मोठ्या तलावांमध्ये बोट राईड करण्याची मजाच वेगळी आहे.
भारतातील सिलिकॉन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूची माहिती तंत्रज्ञान उद्योगासाठी जगभरात एक वेगळी ओळख आहे. येथे तुम्ही तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात आधुनिकतेच्या ग्लॅमरमध्ये करू शकता.