चित्रपट म्हटलं की, तो फ्लॅाप झाला की हिट याविषयी चर्चा तर होतेच. अनेकदा लोक चित्रपटाच्या रेटींगनुसार चित्रपट पाहायचा की नाही ते ठरवत असतात. मात्र इतिहास उलगडून पाहिला तर एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते ती म्हणजे, प्रत्येक वेळी फ्लॅाप ठरलेला चित्रपच हा वाईटच असतो असे नाही. अनेक जुने चित्रपट जे फ्लॅाप ठरले त्यांना आजही लोक आवडीने पाहतात. असाच एक चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला आणि पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होेताच हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
बॉलीवूडचा तो फ्लॉप चित्रपट जो री-रिलीजनंतर ठरला ब्लॉकबस्टर! 'शोले'चाही मोडला विक्रम
विशेष म्हणजे 2018 मध्ये जेव्हा या चित्रपटाला रिलीज करण्यात आले तेव्हा हा चित्रपट जोरदार आपटला. मात्र 2024 मध्ये या चित्रपटाला रिलीज करताच यावर प्रेक्षकांचा वर्षाव झाला. आम्ही बोलत आहोत, सोहम शाहच्या 'तुंबाड' या चित्रपटाविषयी, जो रि-रिलीजनंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरत आहे.
'तुंबाड' 13 सप्टेंबरला पुन्हा रिलीज झाला. रि-रीलीजनंतर या चित्रपटाने खच्चून कमाई केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत 22.63 कोटींची कमाई केली. चित्रपटाच्या पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे कलेक्शन 34 कोटींवर पोहोचले आहे.
'तुंबाड'ने दुसऱ्या वीकेंडला 7.40 कोटींची कमाई केली. भारतात पुन्हा रिलीज झाल्यानंतर 'तुंबाड'चे नेट कलेक्शन 24.10 कोटी रूपयांवर पोहचले आहे.
हा चित्रपट एक सस्पेंस थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट संपूर्णपणे काल्पनिक आहे. यात स्वातंत्र्यापूर्वी महाराष्ट्रातील एका गावातील कथा दाखवण्यात आली आहे.
माणसाचा लोभ त्याचा कसा जीव घेतो, याचे उत्तम सादरीकरण या चित्रपटात करण्याता आले आहे. 'तुंबाड' नंतर आता लवकरच याचा सिक्वेल 'तुंबाड' 2 येणार असल्याची घोषणा मेकर्सने केली आहे.