• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Swati Patel Success Story Marathi

नोकरी… ते काय असतं? स्वातीने नाकारला जॉब आणि तीन महिन्यात दहा हजारांचे केले लाखो रुपये

जयपूरमधील २५ वर्षीय स्वाती पटेल यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून उद्योजकतेचा मार्ग निवडला. ऑगस्ट २०२५ मध्ये अवघ्या १० हजार रुपयांत त्यांनी ‘ग्रीन फॉरेस्ट’ या सॅलड स्टार्टअपची सुरुवात केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 03, 2026 | 08:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ही यशोगाथा आहे जयपूरमधील २५ वर्षीय स्वाती पटेल यांची. कॉर्पोरेट क्षेत्रातील सुरक्षित आणि चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी उद्योजकतेचा धाडसी मार्ग निवडला. अ‍ॅमेझॉन आणि रिव्होल्यूटसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करूनही स्वाती यांच्या मनात कायम स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. याच जिद्दीमुळे ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांनी अवघ्या १० हजार रुपयांच्या भांडवलावर ‘ग्रीन फॉरेस्ट’ (Green Forest) या स्टार्टअपची सुरुवात केली. लोकांना महागडे नव्हे, तर परवडणारे, ताजे आणि विदेशी प्रकारचे सॅलड उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्देश होता. अवघ्या तीन महिन्यांत ३ लाख रुपयांहून अधिक उलाढाल करून त्यांनी छोट्या कल्पनेतूनही मोठे यश मिळवता येते, हे सिद्ध करून दाखवले.

नववर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर! पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये करण्यात आले पुस्तकांचे वितरण

स्वाती पटेल या मूळच्या मध्य प्रदेशातील आहेत. त्यांनी इंदूर येथून बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर बंगळुरू येथील जैन विद्यापीठातून एमबीए केले. गेल्या पाच वर्षांपासून त्या जयपूरमध्ये वास्तव्यास आहेत. करिअरची सुरुवात त्यांनी टेक्निकल सपोर्टसारख्या भूमिकांमधून केली. मात्र नोकरी करत असतानाही त्यांच्या मनात उद्योजक होण्याची ओढ कायम होती. ‘ग्रीन फॉरेस्ट’पूर्वी त्यांनी आर्ट आणि हँडक्राफ्टेड डेनिम या क्षेत्रातही प्रयत्न केले, मात्र तो व्यवसाय मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरू शकला नाही.

२०२५ मध्ये स्वाती यांनी आपल्या खाण्याच्या आवडीला व्यवसायाचे रूप देण्याचा निर्णय घेतला. त्या स्वतःसाठी नियमितपणे हेल्दी सॅलड बनवत असत. त्यांच्या खास ड्रेसिंग्सची चव मित्र-मैत्रिणींना खूप आवडू लागली. सर्वांनी केलेल्या कौतुकानंतर स्वाती यांनी स्थिर नोकरी सोडून सॅलड स्टार्टअप सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांनी केवळ १० हजार रुपयांतून व्यवसाय सुरू केला. यामध्ये सुमारे ३ हजार रुपये भाज्यांसाठी, ६ हजार रुपये इतर कच्च्या मालासाठी खर्च करण्यात आले, तर उर्वरित रक्कम पॅकेजिंग आणि लेबलिंगसाठी वापरली. सुरुवात मात्र अजिबात सोपी नव्हती. जयपूरच्या जीटी सेंट्रल मार्केटमध्ये पहिल्याच दिवशी त्यांनी मोफत सॅम्पल वाटले. त्यानंतर एका कॉर्पोरेट ऑफिसबाहेर तब्बल तीन तास त्यांना नकारांचा सामना करावा लागला. तरीही त्या खचल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांनी ‘पत्रिका गेट’ येथे स्टॉल लावला. सकाळच्या फेरफटक्यासाठी आलेल्या नागरिकांनी अवघ्या पाच मिनिटांत त्यांचे सर्व सॅलड खरेदी केले.

नंतर स्विगी आणि झोमॅटो या फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सवर लिस्ट झाल्यानंतर त्यांना लक्षात आले की मोठ्या प्रमाणातील कमिशनमुळे त्यांचा ‘परवडणारा’ मॉडेल अडचणीत येत आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी दर कमी ठेवण्याच्या उद्देशाने त्यांनी या अ‍ॅप्सपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. सध्या त्या व्हॉट्सअ‍ॅप आणि ऑफलाइन मार्केटिंगवर भर देत असून उबर आणि पोर्टरच्या माध्यमातून संपूर्ण जयपूरमध्ये डिलिव्हरी करतात.

आता विद्यार्थिनींना मिळणार १००% मोफत शिक्षण! स्त्री शिक्षणाचा जागर

स्वाती या मेयोनीज तसेच लसूण-कांदा न वापरता स्वतःच्या खास ड्रेसिंग्स तयार करतात. चुकंदर, पनीर चीज, चणे यांसारख्या घटकांपासून बनवलेली ही ड्रेसिंग्स ग्राहकांना विशेष आवडत आहेत. सप्टेंबरमध्ये दररोज १० ऑर्डरपासून सुरू झालेला प्रवास नोव्हेंबरमध्ये १२० ऑर्डर प्रतिदिनपर्यंत पोहोचला. गेल्या तीन महिन्यांत त्यांनी ५ हजारांहून अधिक ऑर्डर पूर्ण करून ३ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले आहे. ५० रुपयांपासून २४९ रुपयांपर्यंत किमतीचे त्यांचे सॅलड आज जयपूरमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. आरोग्यदायी अन्न प्रत्येकाच्या आवाक्यात असावे, हेच स्वाती यांचे अंतिम ध्येय आहे.

Web Title: Swati patel success story marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • Business News
  • Career

संबंधित बातम्या

LIC चे नव्या वर्षात नवे 5 प्लान, सुरक्षा, बचत आणि पेन्शनसह मिळणार एकापेक्षा एक फायदे
1

LIC चे नव्या वर्षात नवे 5 प्लान, सुरक्षा, बचत आणि पेन्शनसह मिळणार एकापेक्षा एक फायदे

आम्रपाली ग्रुपवर ईडी फास आवळला, 99 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई
2

आम्रपाली ग्रुपवर ईडी फास आवळला, 99 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई

Budget 2026 : २०२६ च्या अर्थसंकल्पात घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी? गृहकर्ज स्वस्त होणार!
3

Budget 2026 : २०२६ च्या अर्थसंकल्पात घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी? गृहकर्ज स्वस्त होणार!

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य
4

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नोकरी… ते काय असतं? स्वातीने नाकारला जॉब आणि तीन महिन्यात दहा हजारांचे केले लाखो रुपये

नोकरी… ते काय असतं? स्वातीने नाकारला जॉब आणि तीन महिन्यात दहा हजारांचे केले लाखो रुपये

Jan 03, 2026 | 08:03 PM
‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

Jan 03, 2026 | 07:50 PM
चित्रपटप्रेमींसाठी खास भेट! ९ जानेवारीपासून मुंबईत चित्रपट महोत्सवाची मेजवानी, ५० पेक्षा जास्त देशांच्या चित्रपटांचा समावेश

चित्रपटप्रेमींसाठी खास भेट! ९ जानेवारीपासून मुंबईत चित्रपट महोत्सवाची मेजवानी, ५० पेक्षा जास्त देशांच्या चित्रपटांचा समावेश

Jan 03, 2026 | 07:46 PM
स्कॅमर्सचा गेम ओव्हर! आत्ताच ON करा फोनमधील या 2 सेटिंग्स; OTP, लिंक, कॉल स्कॅमपासून राहाल सुरक्षित

स्कॅमर्सचा गेम ओव्हर! आत्ताच ON करा फोनमधील या 2 सेटिंग्स; OTP, लिंक, कॉल स्कॅमपासून राहाल सुरक्षित

Jan 03, 2026 | 07:45 PM
Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Jan 03, 2026 | 07:31 PM
Pune News: “राष्ट्रवादीकडेच शहराच्या…”; ‘या’ भागात प्रचाराला सुरुवात करताना काय म्हणाले आमदार शेळके?

Pune News: “राष्ट्रवादीकडेच शहराच्या…”; ‘या’ भागात प्रचाराला सुरुवात करताना काय म्हणाले आमदार शेळके?

Jan 03, 2026 | 07:26 PM
४२ व्या वर्षी चौथ्यांदा लग्नबंधनात अडकणार ‘ही’ अभिनेत्री? पतीसमोरच व्यक्त केली लग्नाची इच्छा

४२ व्या वर्षी चौथ्यांदा लग्नबंधनात अडकणार ‘ही’ अभिनेत्री? पतीसमोरच व्यक्त केली लग्नाची इच्छा

Jan 03, 2026 | 07:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Jan 03, 2026 | 07:24 PM
Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Jan 03, 2026 | 07:12 PM
Navi Mumbai :  पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Navi Mumbai : पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Jan 03, 2026 | 05:39 PM
Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Jan 03, 2026 | 05:33 PM
Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Jan 03, 2026 | 04:41 PM
Vasai : नायगावच्या सलूनमध्ये वाजलं ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ गाणं

Vasai : नायगावच्या सलूनमध्ये वाजलं ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ गाणं

Jan 03, 2026 | 03:23 PM
Nanded:  भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा

Nanded: भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा

Jan 03, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.